Rosalia Lombardo : शतकांपूर्वीचं प्रेत करतं डोळ्यांची उघडझाप; विज्ञानाने उलघडलं ‘स्लीपिंग ब्युटी’ ममीचं रहस्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rosalia Lombardo) भुताखेताच्या नुसत्या गोष्टी ऐकल्या तरीही आपल्याला घाम फुटतो. मग अशावेळी जीव निघून गेलेल्या प्रेताला डोळे उघडताना पाहिलं तर काय अवस्था होईल? याची साधी कल्पना सुद्धा करवत नाही. पण हि कल्पना सत्यात अवतरली आहे. होय. इटलीच्या सिसिली भागातील भूगर्भात १०० वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या मुलीचा मृतदेह जतन करून ठेवण्यात आला आहे. हे १०० वर्ष जुनं प्रेत डोळ्यांची उघडझाप करतं असं अनेकांचं म्हणणं आहे.

सिसिलीत जतन करून ठेवलेलं हे प्रेत १०० वर्ष जुनं आहे. पण प्रत्यक्षात पाहिल्यावर हे प्रेत इतक्या मागील काळातले असेल यावर विश्वास बसणार नाही. हा मृतदेह ज्या मुलीचा आहे तिचा मृत्यू आजपासून १०० वर्षांपूर्वी म्हणजेच १९२० साली झाला होता. तेव्हापासून हा मृतदेह आजतागायत अत्यंत व्यवस्थित पद्धतीने जतन करण्यात आला आहे. (Rosalia Lombardo) हे प्रेत प्रत्यक्षात पाहिलेली काही लोक सांगतात कि, या मृत मुलीच्या चेहऱ्याकडे फार काळ पाहत राहिले असता तिच्या डोळ्यांची उघडझाप होताना दिसते.

आता तुम्ही म्हणाल कि, मृत शरीराची हालचाल होऊ शकत नाही. मग डोळ्यांची उघडझाप कशी शक्य आहे? हा एकतर भुताटकीचा प्रकार असेल किंवा मग चेटूक. तर मित्रांनो, विज्ञानाने या प्रकाराचे गूढ उकलून काढले आहे. हे गूढ तुम्हालाही जाणून घ्यायचे असेलचं. चला तर जाणून घेऊया विज्ञान काय सांगतंय?

हा मृतदेह कुणाचा?

हे प्रेत एका मुलीचं आहे. जिचे नाव रोसालिया लोम्बार्डो (Rosalia Lombardo) असे होते. वयाच्या दुसऱ्या वर्षीच तिचा न्यूमोनियाने बळी घेतला. आपल्या चिमुकल्या लेकीला गमावून तिचे वडील मारिओ लोम्बार्डो फारच दुःखी आणि निराश झाले होते. त्यामुळे लोम्बार्डो यांनी आपल्या मुलीचा मृतदेह दफन न करता त्याला जतन करण्याचे ठरविले. त्या काळातील प्रसिद्ध अशा मृतदेह जतन करणाऱ्या तज्ञाकडून (Embalmer) लोम्बार्डो यांनी आपल्या मुलीच्या प्रेताचे जतन करून घेतले.

रोझालिया ‘स्लीपिंग ब्युटी’ (Rosalia Lombardo)

मृत रोसालियाच्या प्रेताचे जतन करणाऱ्या तज्ञाचे नाव अल्फ्रेडो सालाफिया असे होते. इतिहासात त्याच्या नावाचा उल्लेख आहे. अल्फ्रेडोने रोसालियाचे प्रेत एका खास रसायनाचा वापर करून जतन केले आहे. जे १०० वर्षांनंतर आजही होते तसेच आहे. या खास रसायनामुळेच रोझालिया ममीला सिसिली भागात ‘स्लीपिंग ब्युटी’ असे नाव पडले.

‘असे’ केले प्रेताचे जतन

मृत रोसालियाच्या प्रेताला जतन करण्यासाठी वापरण्यात आलेल्या रसायनाचा विज्ञानाला देखील २००९ पर्यंत काहीच थांगपत्ता नव्हता. मात्र, अल्फ्रेडो सालाफियाने लिहून ठेवलेल्या वृतांतात या रसायनाचा फॉर्म्युला सापडला. (Rosalia Lombardo) त्यानुसार, हे चमत्कारिक रसायन तयार करण्यासाठी अल्फ्रेडोने फॉरमॅलीन, झिंक लवण, अल्कोहोल, सॅलिसिक ऍसिड आणि ग्लिसरीनचा वापर केल्याचे वैज्ञानिकांसमोर आले.

मृत रोसालियाच्या कथेभोवती भुताटकी

१०० वर्षांपूर्वी मृत पावलेल्या रोसालियाचे प्रेत प्रत्यक्षात पाहणाऱ्या काही लोकांनी ती डोळ्यांची उघडझाप करते असे म्हटले. यामुळे रोसालिया ममीची दहशत निर्माण झाली. लोक तिखट मीठ लावून भुताटकीच्या नवनवीन गोष्टी बनवू लागले. मात्र विज्ञानाने या लोकांच्या विधानांवर लक्ष केंद्रित केले आणि यामागील गूढ जगासमोर आणले.

(Rosalia Lombardo) वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासानुसार, रोसालियाचे उघडझाप करणारे डोळे हि भुताटकी नसून दृष्टीभ्रम आहे. हे प्रेत ज्या काचेच्या पेटीत ठेवले आहे तेथील प्रवर्तित होणाऱ्या प्रकाशामुळे तसा भास होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याशिवाय आणखी एक महत्वाची गोष्ट नमूद करण्यात आली आहे. ती अशी कि, या प्रेताचे डोळे अर्ध्या उघडलेल्या अवस्थेत आहेत. ज्यामुळे प्रकाशाच्या स्थितीनुसार तिच्या पापण्यांची उघड झाप होत असल्याचा भास होतो.