Saif Ali Khan Attack : अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट आता समोर आली असून सैफ अली खान वर झालेल्या हल्ल्या प्रकरणी एका संशयताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संशयीताकडून वांद्रे पोलीस ठाण्यात पोलीस कसून चौकशी करत आहेत. काल माध्यमांमध्ये या हल्लेखोराबद्दल एक फोटो व्हायरल झाला होता. मात्र आता ताब्यात घेतलेली व्यक्ती ही त्या फोटोमधीलच आहे की नाही हे मात्र स्पष्ट झालेलं नाहीये. सैफ अली खानच्या घरामधील एका कॅमेरामध्ये या व्यक्तीचा चेहरा समोर आला होता. दरम्यान या प्रकरणाबाबत संपूर्ण देशभर चर्चा असून या प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची मोठी टीम काम करत आहे.
या प्रकरणातील टेक्निकल डेटा सुद्धा पोलिसांनी काढला असून यावर ते तपास (Saif Ali Khan Attack) करत आहेत. 16 जानेवारीच्या रात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान चोरीच्या उद्देशाने एक व्यक्ती सैफच्या घरामध्ये घुसला आणि त्यानंतर झालेल्या झटापटीमध्ये सैफ अली खान मोठ्या प्रमाणात जखमी झाला आणि त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून त्याच्यावरील एक मोठी शस्त्रक्रिया सुद्धा पार पडली आहे. या जीवघेण्या हल्ल्यातून सैफ बचावला आहे.
दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मधील आरोपीची क्लिप मुद्दाम बाहेर आणली होती जेणेकरून आरोपी (Saif Ali Khan Attack) लवकरात लवकर पोलिसांच्या ताब्यात मिळू शकेल. घटना घडून गेल्यानंतर तब्बल 32 तासाने मुंबई पोलिसांच्या हाती एक संशयित आरोपी लागला आहे.
प्राथमिक तपासात अभिनेता सैफ अली खान ज्या इमारतीत राहत होता त्या इमारतीच्या छतावर काही देखभालीचे काम करणाऱ्या दोन मजुरांची मुंबई पोलिस चौकशी करत आहेत. ही प्राथमिक चौकशी असून आरोपींपर्यंत कोणती लिंक आहे हे शोधण्यासाठी पोलीस (Saif Ali Khan Attack) करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घुसखोराला त्या इमारतीची पूर्ण माहिती होती. त्यामुळे संशयाची सुई इथे कामासाठी येणाऱ्या कामगारांवर आहे.