Salman Khan : ईदच्या मुहूर्तावर भाईजानच्या नव्या सिनेमाची घोषणा; पहिलं पोस्टरही केलं रिलीज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Salman Khan) बॉलिवूड सिनेविश्वाचा लाडका अभिनेता आणि प्रेक्षकांचा भाईजान अर्थात सलमान खान हा कायम ईदच्या निमित्ताने प्रेक्षकांना सरप्राईज देत असतो. प्रत्येक ईदला सलमानचा एखादा चित्रपट प्रदर्शित होतो. मात्र यावेळी भाईजानचा चित्रपट रिलीज झाला नाही. तर त्याने नव्या चित्रपटाची घोषणा करत चाहत्यांना वेगळी ‘ईदी’ दिली आहे. ईदच्या शुभेच्छा देताना सलमानने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करत हा चित्रपट २०२५ च्या ईदला प्रदर्शित होईन असेही सांगितले आहे.

भाईजानचा नवा सिनेमा (Salman Khan)

अहिनेत सलमान खानने यंदाच्या ईद दिवशी आपल्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव ‘सिकंदर’ असे आहे. माहितीनुसार, त्याचा हा नवीन चित्रपट २०२५ च्या ईदला प्रदर्शित होणार आहे. महत्वाचे म्हणजे, ‘सिकंदर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘गजनी’ फेम दाक्षिणात्य दिग्दर्शक करणार असल्याचे समजत आहे. त्यामुळे भाईजानच्या नव्या सिनेमाला साऊथ टच असण्याची शक्यता आहे. सलमान खानने त्याच्या खास अंदाजात आपल्या नव्या सिनेमाची घोषणा करत चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे.

पोस्टर आउट

सलमान खानने ईदच्या शुभेच्छा देताना न केवळ चित्रपटाची घोषणा केली तर यावेळी त्याने चित्रपटाचं पहिलं पोस्टरदेखील प्रदर्शित केलं आहे. या पोस्टरमध्ये चित्रपटाचे नाव लिहिलेले दिसत आहे. तसेच यासोबत त्याने पोस्टमध्ये प्रेक्षकांना एक आवाहन केलं आहे. X हँडलवर ही पोस्ट शेअर करताना सलमानने (Salman Khan) कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘या ईदला ”बडे मियाँ छोटे मियाँ” आणि ”मैदान” पाहा आणि पुढच्या ईदला ”सिकंदर” तुमच्या भेटीला येईल… तुम्हा सर्वांना ईद मुबारक! चित्रपटाचं दिग्दर्शन एआर मुरुगदास करतील, तर निर्मिती साजित नाडियाडवालांची असेल’.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

ईद येणार म्हटलं की भाईजानचे चाहते कायम त्याच्या आगामी सिनेमाबाबत उत्सुक असतात. मात्र यंदा ईदच्या दिवशी भाईजानचा कोणताच सिनेमा रिलीज झाला. यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला. चाहत्यांनी नाराजी घालवण्यासाठी भाईजानने (Salman Khan) आपल्या ‘सिकंदर’ या नव्या सिनेमाची घोषणा करत पुढच्या वर्षी ईदला हा सिनेमा प्रदर्शित करण्याचे वचन दिले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या सिनेमाचे पहिले पोस्टर समोर येताच चाहत्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. तसेच पोस्टवरील कमेंट्समध्ये येणाऱ्या सिनेमाबाबतची उत्सुकता देखील दिसून येत आहे.