Salman Khan : गोळीबारानंतर सलमान खानचा मोठा निर्णय; भाईजान मुंबई सोडणार??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Salman Khan) बॉलिवूड सिने इंडस्ट्रीचा भाईजान अर्थात प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सलमान खान कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. कधी वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी लाईमलाईट न्यूजमुळे सलमान खान या नावाची चर्चा सुरु असते. सलमानचा चाहता वर्ग फार मोठा आहे जो त्याच्यावर अतोनात प्रेम करतो. त्यामुळे भाईजानविषयी एखादी बातमी आली की, चाहत्यांचे कान लगेच टवकारतात. अलीकडेच काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. यानंतर अभिनेत्याच्या सुरक्षिततेबाबत यंत्रणा सक्रिय झाली असून चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच सलमान खान आता मुंबई सोडणार असल्याचे समोर आले आहे.

भाईजान गॅलॅक्सी सोडणार (Salman Khan)

बाॅलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर १४ एप्रिल २०२४ रोजी गोळीबार झाला. त्या दिवसापासून त्याच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. कारण, ज्यावेळी गोळीबार झाला त्यावेळी सलमान खान घरातच होता. या ठिकाणी कोणतीही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. (Salman Khan) या प्रकरणात पुढे पोलिसांनी गुजरातमधून हल्लेखोरांना ताब्यात घेतले. मात्र अजूनही काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जातेय. अभिनेता सलमान खान हा मुंबई बांद्रा येथे त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो, हे सगळेच जाणतात.

सुरक्षेसाठी मोठा निर्णय

अनेकदा घराच्या बाल्कनीत येऊन सलमान आपल्या चाहत्यांची भेट घेताना दिसतो. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना याबाबत चांगलीच माहिती होती. त्यामुळे हल्लेखोरांचा निशाणा सलमान खानच्या घराची बाल्कनी होती. मुख्य म्हणजे, ज्यावेळी गोळीबार झाला त्यावेळी अभिनेता घरातच होता. (Salman Khan) या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच हल्लेखोरांना पकडले. मात्र अभिनेत्याच्या सुरक्षेबाबत मोठी चिंता व्यक्त करण्यात आली. यानंतर आता नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, सलमान खानने मोठा निर्णय घेतल्याचे समजत आहे.

कुठे जाणार?

यानुसार आता लवकरच सलमान मुंबईतील गॅलॅक्सी अपार्टमेंटचा निरोप घेऊन पनवेलच्या फार्म हाऊसवर शिफ्ट होणार असल्याचे समजत आहे. बऱ्याचवेळा सलमान पनवेलच्या फार्म हाऊसवर वेळ घालवतो. त्याला मुंबईतील घरापेक्षा पनवेलच्या फार्महाऊसवर राहणे अधिक आवडते. (Salman Khan) शिवाय गॅलेक्सी अपार्टमेंटपेक्षा पनवेलच्या फार्म हाऊसवर अधिक सुरक्षा असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे सलमान खानने गॅलॅक्सी सोडून फार्महाऊसवर जाण्याचा निर्णय घेतला असावा. याबाबत अद्याप सलमानने कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही. मात्र काही वृत्तानुसर, सलमान त्याच्या कुटुंबियांसह पनवेलच्या फार्म हाऊसवर शिफ्ट होण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात आले आहे.