samruddhi expressway : राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून समृद्धी महामार्गाचे नाव आवर्जून घेतले जाते. हा मार्ग राज्याची राजधानी मुंबईला नागपूरशी जोडतो. या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच याचे काम पूर्ण होणार असून या प्रकल्पाचा शेवटचा टप्पा खुला झाल्यानंतर हा मार्ग मुंबई ते नागपूर असा पूर्णपणे खुला होईल. या मार्गाबाबत महत्वाची अपडेट हाती आली असून शेवटचा टप्पा महिनाभरात (samruddhi expressway) खुला होणार आहे.
किचकट पुलाचे काम मार्गी (samruddhi expressway)
एवढेच नाही तर समृद्धी महामार्गाला अनेक कनेक्टर जोडले जाणार आहेत यामध्ये आमने येथून पुढे नाशिक मार्गावरील वडपे पर्यंतची कनेक्टरची काम सुरू आहेत हे काम पूर्ण होतात 76 किलोमीटर लांबीचा शेवटचा टप्पा खुला होणार आहे या टप्प्यात अभियांत्रिकीच्या दृष्टीने किचकट असलेल्या ठाण्यातील खर्डी येथील जवळपास 1.5 किलोमीटर लांबीच्या पुलाचं काम बाकी होतं .
समृद्धी महामार्गावरील पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी हा 2022 डिसेंबर मध्ये सुरू करण्यात आला होता. तर दुसरा टप्प्यात शिर्डी ते भरवीर असा जवळपास 80 किलोमीटरचा मार्ग सुरू करण्यात आला होता. तर समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये भरवीर ते इगतपुरी हा 23 किलोमीटरचा मार्ग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर आता शेवटचा टप्पा हा 76 किलोमीटरचा असणार आहे आणि हा शेवटचा टप्पा महिन्याभरात (samruddhi expressway) पूर्ण होऊन संपूर्ण नागपूर ते मुंबई असा समृद्धी महामार्ग खुला केला जाणार आहेत. हा पूर्ण मार्ग 701 किलोमीटर लांबीचा असून यामुळे नागपूर ते मुंबई हा प्रवास अभ्यासात ते आठ तासात पूर्ण करता येणार आहे.
प्रवास होणार सोपा (samruddhi expressway)
तसंच समृद्धी महामार्गाचा शेवट होतो त्या आमने इथून पुढे वडपे इथे जाण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या रस्त्याचे काम अपूर्ण होते. या भागात असलेल्या गोडाऊनची जागा रस्त्याच्या कामासाठी आवश्यक होती. ही जागा मिळवण्यात येणाऱ्या अडचणी तसेच सततच्या पावसामुळे ही काम लांबली होती मात्र आता पावसाळा संपल्यानंतर एम एस आर डी सी कडून ही काम जलद गतीने पूर्ण केली जाऊन महिनाभरातच हे काम पूर्ण होतील अशी माहिती एमएसआरडीसीतील अधिकाऱ्यांनी एका माध्यमाला दिली आहे. त्यामुळे मार्चच्या सुरुवातीला हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाऊ शकतो (samruddhi expressway) त्यानंतर मुंबई पर्यंतचा प्रवास हा सुकर होणार आहे.