Samruddhi Highway : भारीच की …! वन्यजीव करीत आहेत समृद्धी महामार्गावरील क्रॉसिंग स्ट्रक्चरचा वापर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Samruddhi Highway : एखाद्या भागात शाश्वत विकास होत असेल तर तेथील जंगले आणि वन्य जीव यांच्या आदिवासावर त्याचा मोठा परिणाम होत असतो. कारण वन्य जीवांचे ते घर असते. रस्त्यांचेच उदाहरण द्यायचे झाल्यास अनेकदा हायवेवरून जाणाऱ्या जलद वाहनांमुळे रस्ता ओलांडणारे वन्य जीव आपला जीव गमावून बसतात. हॉर्नच्या कर्कश आवाजामुळे पक्षांना त्रास होतो मात्र समृद्धी महामार्गच्या (Samruddhi Highway)बाबतील एक चांगली बातमी समोर आली आहे. या महामार्गावर खास वन्य प्राण्यांसाठी उभारण्यात आलेल्या अंडरपास आणि ओवरपासचा हे प्राणी सुयोग्य वापर करत असल्याचं एका अभ्यासांती निदर्शनास आलेले आहे.

विशेष म्हणजे या भागामध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांना वन्यजीवांच्या अधिवासाला महामार्गाचा (Samruddhi Highway) अडथळा येऊ नये म्हणून त्यांच्यासाठी उन्नत आणि भुयारी मार्गाची उभारणी केली आहे. यासाठी खास प्रयत्न करण्यात आले याशिवाय 64 कॅमेरा ट्रॅप्स देखील लावण्यात आले आहेत आणि या कॅमेऱ्यांमधूनच आता या भागातून वन्यजीव अगदी सुरक्षितपणे प्रवास करत असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे वन्यजीव अभ्यासकांनी समाधान व्यक्त केले आहे. म्हणजेच तिथून पर्यावरणाला तेथील वन्य जीवाला कोणताही धक्का न लावता समृद्धी महामार्गाचा विकास झाला आहे असे म्हणावे लागेल.

क्रॉसिंग स्ट्रक्चरचा प्राण्यांकडून वापर (Samruddhi Highway)

64 कॅमेरा मध्ये लावण्यात आलेल्या दृश्यानुसार लहान सस्तन प्राणी आणि मांसाहारी प्राणी या क्रोसिंग स्ट्रक्चर चा वापर करताना दिसून आले आहेत. ज्यामध्ये चिंकारा, नीलगाय, जंगली डुक्कर, भारतीय ससा, मुंगूस अशा प्राण्यांचा समावेश आहे. याबरोबरच एक्सप्रेस वेवर पक्षांची गणना केली जात आहे आजपर्यंत 310 ठिकाणी माहिती संकलित करण्यात आली आहे. याशिवाय पुढच्या पाच वर्षांसाठी सुद्धा अंडरपास आणि ओवर पास निरीक्षण केले जाईल आणि आणखी काय सुधारणा करता येईल हे पाहिले जाणार आहे.

वन्यजीव अभ्यासक डॉक्टर बिलाल हबीब यांनी एका माध्यमाला (Samruddhi Highway) दिलेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावरील वन्यजीवांच्या हालचालींच्या निरीक्षणाचे सुरुवातीचे परिणाम उत्साहवर्धक आहेत चीनकारासारख्या प्रजातींद्वारे ओवर पास चा उत्तम वापर हे चांगले संकेत आहेत.