Samruddhi Mahamarg : मुंबई ते शिर्डी प्रवास सुसाट ! समृद्धी द्रुतगती मार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Samruddhi Mahamarg : नागपूर-मुंबई समृद्धी द्रुतगती महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. हा मार्ग नाशिक जिल्ह्यातील वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. भरवीर ते इगतपुरी या २४.८७ किमी लांबीच्या प्रवासामुळे (Samruddhi Mahamarg) ठाणे आणि मुंबई ते शिर्डी प्रवासाचा वेळ एक तासाने कमी होईल. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी नांदगाव सदो येथील इगतपुरी टोल प्लाझा येथे फलकाचे अनावरण करण्यात आले. समृद्धी महामार्गाच्या या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील २४.८७ किमी लांबीचा समावेश असून हा मार्ग एकूण १६ गावांतून जातो. त्यामध्ये (Samruddhi Mahamarg) पॅकेज १३मधील २३.२५१ व पॅकेज १४मधील १.६२१ किमी लांबीचा समावेश आहे. या टप्प्यात पॅकेज १३अंतर्गत २०० मीटर लांबीचा एक पूल, दारणा नदीवरील ४५० मीटर लांबीचा मोठा पूल, आठ छोटे पूल, वाहनांसाठी पाच भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी आठ भुयारी मार्ग, नऊ ओव्हरपास, तर पॅकेज १४अंतर्गत दारणा नदीवरील ९१० मीटर लांबीच्या महत्त्वाच्या पुलाचा समावेश आहे. प्रकल्पाच्या या टप्प्याचा (Samruddhi Mahamarg) खर्च १०७८ कोटी रुपये आहे.

तिसऱ्या टप्प्याच्या उदघाटनासह हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या ७०१ किमी लांबीच्या (Samruddhi Mahamarg) द्रुतगती महामार्गापैकी ६२५ किमी आता वाहतुकीसाठी खुला झाला आहे, तर इगतपुरी ते आमणे या उर्वरित मार्गावर काम सुरू आहे.