Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर ‘या’ गाड्यांना बंदी; प्रवास करण्याआधी जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे नुकतेच उदघाटन करण्यात आले आहे. आता केवळ हा मार्ग पूर्ण होण्यासाठी एमएसआरडीसीकडून इगतपुरी ते आमनेपर्यंत समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचीही काम वेगवे सुरु आहे. मात्र मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यापूर्वी तुमच्या गाडीची स्थिती नक्की तपासा कारण गुळगुळीत टायरच्या वाहनांना समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) बंदी घालण्यात आली आहे.

गुळगुळीत टायरच्या वाहनांना बंदी

समृद्धी महामार्ग हा मागच्या काही दिवसात अपघातांमुळे मोठा चर्चेत आला आहे. एवढेच नाही तर विरोधकांनी देखील अपघातांचा मुद्दा धरून मोठी टीका केली आहे. मात्र आता या महामार्गावर आरटीओकडून (Samruddhi Mahamarg) विशेष मोहीम राबवली जात असून एन्ट्री करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाते आहे. त्याबरोबरच घासलेल्या टायरच्या वाहनांना परत पाठवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दहा महिन्यात 11500 वाहनांच्या टायरची तपासण्यात करण्यात आली असून गुळगुळीत असलेल्या 200 पेक्षा जास्त वाहनांना समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही जर या मार्गावरून प्रवास करणार असाल तर तुमच्या वाहनाच्या टायरची स्थिती चांगली आहे का हे नक्की तपासा.

कशी होते तपासणी? (Samruddhi Mahamarg)

वाहतूक शाखेकडून तपासणी करणाऱ्या व्यक्तीकडून टायर आणि टायर मधील हवेचा दाब, वाहनाची प्रवासिक क्षमता, इंजिनची स्थिती, वाहनाची आपत्कालीन दरवाजांची स्थिती, तपासणीनंतर वाहन (Samruddhi Mahamarg) सुस्थितीत असेल तरच पुढे पाठवण्यात येते. याशिवाय चालक आणि त्याची स्थिती आणि तसेच टायर मधील नायट्रोजनची स्थिती देखील तपासली जाते.

महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचाच एक भाग म्हणून गुळगुळीत टायर असलेल्या वाहनांना बंदी ही मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) करण्यात आली आहे. याशिवाय इतरही सेफ्टी प्रिकॉशन्स घेतले जात आहेत.