Samrudhi Expressway : राज्य सरकारने काही महत्वाचे रस्ते प्रकल्प हाती घेतले आहेत, त्यापैकीच एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग… 701 किलोमीटर लांबीच्या या महामार्गाचे काम आता पूर्ण होण्यासाठी केवळ शेवटचा टप्पा बाकी आहे, त्यापूर्वी वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आलेल्या मार्गाबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
725 कोटी रुपयांचा महसूल (Samrudhi Expressway)
मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पातील शिर्डी ते भरवीर दरम्यानच्या 80 किलोमीटर वाहतुकीचा टप्पा सेवेत दाखल झाला त्याला आज एक वर्ष पूर्ण झाला आहे. याच मार्गाबाबत आता एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली असून आतापर्यंत या महामार्गावरून तब्बल एक कोटी वाहन धावली आहे. तर या मार्गावरून 725 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला (Samrudhi Expressway) आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सध्या 701 किलोमीटर समृद्धी महामार्गाच्या बांधकामापैकीच 625 किमीचा मार्ग खुला करण्यात आला आहे. यामध्ये नागपूर ते शिर्डी हा टप्पा 2022 मध्ये तर शिर्डी ते धारवीर हा टप्पा 25 मे 2023 रोजी वाहतुकीसाठी खुला झाला होता. याबरोबरच भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा 25 किलोमीटरचा टप्पा हा मार्च 2024 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. या तिन्ही महामार्गांवर चांगली वाहतूक पाहायला मिळत आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद यावरून पाहायला मिळतो आहे. डिसेंबर 2022 पासून 23 मे 2024 पर्यंत या महामार्गावरून 99 लाख 80 हजार वाहनांनी प्रवास केल्याची माहिती एम एस आर डी सी पी एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून (Samrudhi Expressway) मिळाली आहे.
‘या’ वर्षाअखेरपर्यंत मार्ग होणार पूर्ण (Samrudhi Expressway)
आतापर्यंत समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा इगतपुरी ते आमने गाव हा अदयाप पूर्णत्वास आलेला नाही. हे काम सुरू आहे. मात्र महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कार्पोरेशन म्हणजेच एम एस आर डी सी कडून उर्वरित काम येत्या वर्षाअखेर (Samrudhi Expressway) पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती मिळाली आहे.
MSRDC च्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत 90% काम पूर्ण झालेले आहे. उरलेले काम १. ८ किलोमीटर लांबीचे कासरा येथील खर्डी ब्रिज चे आहे जे प्रामुख्याने आव्हान असेल. याशिवाय आठ किलोमीटरच्या लांब बोगद्याचे (Samrudhi Expressway) काम सुद्धा पूर्णत्वास आलेले आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. खरंतर 701 किलोमीटरचा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग हा सहा पदरी मार्ग आहे मात्र खर्डी पुलावर हा मार्ग केवळ चार पदरी राहणार असून थोडासा अरुंद होणार असल्याची माहिती देखील या अधिकाऱ्यांनी दिली आहे.