Samrudhi Highway: महायुती सरकारचा महत्वपूर्ण रस्ते प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग.. समृद्धी महामार्ग आता जालना ते नांदेड द्रुतगती मार्गाला जोडण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीमध्ये जवळपास 80 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये समृद्धी महामार्गाबाबतचा निर्णयही घेण्यात आला. या बैठकीमध्ये समृद्धी महामार्गाला (Samrudhi Highway) जोडणाऱ्या जालना ते नांदेड दुर्गती महामार्गाला मान्यता देण्यात आली आहे.
मुंबई-नांदेड 12 तासांचा प्रवास निम्म्यावर
याद्वारे शहरातील 226 किलोमीटरचे अंतर 179. ८ किलोमीटर एवढे कमी होईल. तसेच मुंबई आणि नांदेड दरम्यानचा बारा तासांचा प्रवास निम्म्यावर येणार आहे. याबरोबरच परभणी, जालना, नांदेड या तीन जिल्ह्यातील आठ तालुक्यातून हा द्रुतगती मार्ग जाणार असून प्रस्तावित जालना नांदेड द्रुतगती मार्ग पुढे हैदराबादला जोडले जाणे अपेक्षित (Samrudhi Highway) आहे.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्रमुख जिल्ह्यांना मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाची जोडण्यासाठी अतिरिक्त कनेक्टर आणि प्रवेश नियंत्रित एक्सप्रेस विकसित करण्याचा प्रस्ताव दिला आहे.जालना नांदेड ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे हा असाच एक कनेक्टर आहे जो नांदेड हिंगोली परभणी आणि जालना जिल्हाना राज्याची राजधानी मुंबई आणि पुढे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला थेट आणि जलद कनेक्टिव्हिटी प्रदान (Samrudhi Highway) करेल.
हा एक्सप्रेस वे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर जालना येथून सुरू होतो आणि जालना परभणी आणि नांदेड जिल्ह्यातून नैऋत्यकडे जातो आणि नांदेड -देगलूर- तेलंगणा एन एच 161 वर संपतो. हा सहा लेनचा एक्सप्रेसवे डिझाईन वेग 120 किलोमीटर प्रति तास असेल आणि शंभर मीटर उजवीकडे असेल. या मार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे (Samrudhi Highway) हाय स्पीड रेल्वे कॉरिडोरच्या बांधकामासाठी वीस मीटर जागेची तरतूद देखील या मार्गासाठी करण्यात आली आहे.