हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Samsung Galaxy F06 5G – सॅमसंगने (Samsung)आपला सर्वात स्वस्त 5G फोन Galaxy F06 5G भारतात लाँच केला आहे. त्यामुळे ज्यांना कमी किंमतीत चांगला आणि दमदार फीचर्सवाला फोन हवा असेल, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये Android 15 ऑपरेटिंग सिस्टम दिली आहे आणि याला चार वर्षांचे अपडेट मिळणार आहेत, म्हणजेच तुम्ही 2029 पर्यंत हा फोन वापरू शकता. तर चला या फोनचे फीचर्स , किंमत इत्यादींची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊयात.
Galaxy F06 5G चे फीचर्स (Samsung Galaxy F06 5G) –
Galaxy F06 5G मध्ये 6.7-इंच HD+ LCD डिस्प्ले आहे, जो 60Hz रिफ्रेश रेट आणि 800 Nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. यामध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर असून 4GB आणि 6GB RAM च्या पर्यायांसह 128GB स्टोरेज आहे. तसेच स्टोरेज 1TB पर्यंत माइक्रो SD कार्डने वाढवता येते. या फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट आहे, 50MP रियर कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे, तसेच 8MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. तसेच फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. 3.5mm ऑडियो जैक आणि 5000mAh बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये टाइप-सी चार्जिंग पोर्ट देखील दिलेले आहे.
किंमत –
सॅमसंग Galaxy F06 5G निळ्या आणि लिट वायलेट या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. 4GB RAM+128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,499 रुपये आहे, जी 500 रुपये कॅशबॅक नंतर असेल. 6GB RAM+128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन (Samsung Galaxy F06 5G) तुम्ही सर्व रिटेल स्टोअर्स आणि सॅमसंगच्या वेबसाइटवरून खरेदी करू शकता. त्याची विक्री 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.