Samsung Galaxy M16, M06 स्मार्टफोन भारतात लाँच; 5000mAh बॅटरीसह 25W फास्ट चार्जिंग

0
14
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सॅमसंगने भारतात आपले दोन नवीन Galaxy M-Series स्मार्टफोन लाँच केले आहेत. सॅमसंग Galaxy M06 आणि Galaxy M16 हे कंपनीचे नवीन स्मार्टफोन आहेत. दक्षिण कोरियातील या कंपनीचे दोन्ही स्मार्टफोन 5G कनेक्टिविटीसह बजेट श्रेणीतील आहेत. Galaxy M06 आणि Galaxy M16 ह्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये स्लिम डिझाइन दिले गेले आहे. तर चला, जाणून घेऊया या नवीन सॅमसंग गॅलक्सी M06 आणि M16 स्मार्टफोनच्या खासियत आणि त्यांचे फीचर्स.

Galaxy M16 चे फीचर्स –

सॅमसंग Galaxy M16 स्मार्टफोन, Galaxy M15 च्या तुलनेत 15% अधिक स्लिम आहे. हा फोन मिंट ग्रीन, ब्लश पिंक आणि थंडर ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. Galaxy M16 मध्ये 6.6 इंचाची सुपर AMOLED डिस्प्ले दिली आहे, जी Full HD+ स्क्रीन रिझोल्यूशन ऑफर करते. स्क्रीन Vision Booster आणि Eye Care Shield सपोर्ट करते. यामध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 प्रोसेसर आहे. हा फोन 4GB/6GB/8GB RAM आणि 128GB स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये 50 मेगापिक्सल प्रायमरी रियर कॅमेरा, 5 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेंस आहेत. फ्रंट कॅमेरा 13 मेगापिक्सल आहे.

Galaxy M16 मध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन Android 15 सोबत येतो आणि त्याला 6 वर्षांपर्यंत OS आणि सिक्योरिटी अपडेट्स मिळतात. स्मार्टफोनमध्ये 11 5G बँड्स, ऑल-नेटवर्क सपोर्ट, Wi-Fi 5, Bluetooth 5.3, NFC आणि GPS फीचर्स आहेत. यात Samsung Knox, Voice Focus आणि फिंगरप्रिंट सेंसर देखील दिले गेले आहेत.

Galaxy M06 स्मार्टफोनचे फीचर्स –

सॅमसंग Galaxy M06 स्मार्टफोन स्लिम डिझाइनसोबतच अपग्रेडेड प्रोसेसर, उत्तम सॉफ्टवेअर सपोर्ट आणि 5G सपोर्ट ऑफर करतो. या फोनमध्ये सेज ग्रीन आणि ब्लेजिंग ब्लॅक रंग उपलब्ध आहेत. Galaxy M06 मध्ये 6.7 इंचाची LCD स्क्रीन आहे जी HD रिझोल्यूशन ऑफर करते. मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 प्रोसेसर यामध्ये दिला आहे. फोनमध्ये 4GB/6GB RAM आणि 128GB स्टोरेज आहे. फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आहे. 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देखील दिला आहे. 5000mAh बॅटरी आहे जी 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. हा स्मार्टफोन Android 15 आधारित आहे आणि त्याला 4 मोठे OS आणि सिक्योरिटी अपडेट्स मिळणार आहेत.

कनेक्टिविटीसाठी 12 5G बँड्स, ऑल-नेटवर्क सपोर्ट, Wi-Fi 5, Bluetooth 5.3 आणि GPS यांसारखे फीचर्स आहेत. फोनमध्ये Samsung Knox, Voice Focus आणि फिंगरप्रिंट स्कॅनर देखील दिला आहे.

विक्री तारीख अन किंमत –

सॅमसंग Galaxy M06 स्मार्टफोन 7 मार्चपासून आणि Galaxy M16 स्मार्टफोन 5 मार्चपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. दोन्ही स्मार्टफोन Amazon India वर उपलब्ध असतील. तसेच सॅमसंग Galaxy M16 स्मार्टफोनची किंमत रु 11,499 पासून सुरू होते, तर Galaxy M06 ची किंमत रु 9,499 आहे. हे दर बँक ऑफर्ससह आहेत.