Samsung Galaxy M56 5G: दमदार फीचर्ससह Samsung Galaxy M56 5G लाँच; पहा किंमत

Samsung Galaxy M56 5G
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Samsung Galaxy M56 5G सॅमसंगने भारतात आपला नवा मिड-रेंज स्मार्टफोन Samsung Galaxy M56 5G लाँच केला आहे. हा फोन M-सीरीजमधील एक अपग्रेडेड डिव्हाइस असून यामध्ये दमदार फीचर्ससह आकर्षक आणि स्लिम डिझाइन दिले आहे. Galaxy M55 5Gच्या तुलनेत M56 मध्ये 36 टक्के अधिक स्लिम बेजल्स आहेत, जे याला एक प्रीमियम लुक देतात. यामध्ये 6.73 इंचांचा Full HD+ SAMOLED+ डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. Vision Booster तंत्रज्ञानामुळे स्क्रीनचा अनुभव जबरदस्त होतो.

Samsung Galaxy M56 5G चे फीचर्स –

फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे आणि तो Android 15 आधारित One UI 7 वर चालतो. कंपनीने याला 6 वर्षे OS अपडेट्स आणि 6 वर्षे सिक्युरिटी अपडेट्स देण्याचं आश्वासन दिलं आहे. Galaxy M56 5G मध्ये 8GB RAM आणि 256GB स्टोरेजपर्यंत सपोर्ट आहे. कॅमेराच्या बाबतीत, यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP चा OIS सपोर्ट असलेला मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP मॅक्रो सेन्सर दिले आहेत. सेल्फीसाठी 12MP फ्रंट कॅमेरा आहे जो HDR व्हिडिओ सपोर्ट करतो. AI Imaging फीचर्ससह Object Eraser, Image Clipper सारखे स्मार्ट टूल्सदेखील यात आहेत.

बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी –

फोनला 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याशिवाय डिव्हाइसला Corning Gorilla Glass Victus+ प्रोटेक्शन आहे. Galaxy M56 5G मध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth 5.3, GPS आणि USB Type-C यांसारखे कनेक्टिव्हिटी पर्याय दिले गेले आहेत. फोनचे वजन 180 ग्रॅम असून त्याची जाडी फक्त 7.2mm आहे, जे याला खूपच स्लिम बनवते.

किंमत अन डिस्काउंट –

या फोनच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 27,999 रु ठेवण्यात आली आहे. हा फोन 23 एप्रिलपासून दुपारी 12 वाजता Amazon आणि Samsung India च्या वेबसाइटवरून खरेदीसाठी उपलब्ध होईल. HDFC बँकेच्या कार्डने खरेदी केल्यास ग्राहकांना 3,000 रु चा इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे. फोन काळ्या आणि हिरव्या या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. एकंदरीत, Samsung Galaxy M56 5G हा एक स्टायलिश, परफॉर्मन्स ओरिएंटेड आणि लॉंग-टर्म अपडेट्ससह येणारा स्मार्टफोन आहे.