हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Samsung Mobiles – सॅमसंगचे (samsung) दोन नवे स्मार्टफोन Galaxy F16 5G आणि Galaxy F06 5G भारतात लाँच झाले आहेत. हे दोन्ही एंट्री-लेव्हल बजेट 5G स्मार्टफोन आहेत. यामध्ये Galaxy F16 5G प्रीमियम स्मार्टफोन आहे. तसेच दोन्ही 5G स्मार्टफोन ग्राहकांना 9,999 रुपये किंमतीपासून उपलब्ध करून दिले आहे. तुम्हाला जर कमी किमतीत दमदार स्मार्टफोन द्यायचा असेल, तर तुमच्यासाठी हा पर्याय उत्तम ठरू शकतो. तर चला या फोनच्या 5G कनेक्टिव्हिटीसोबत इतर फीचर्स कसे आहेत याची सविस्तर माहिती जाणून घेऊ.
सॅमसंग Galaxy F16 5G चे फीचर्स (Samsung Mobiles )–
सॅमसंग Galaxy F16 5G स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच AMOLED डिस्प्ले आहे. यामध्ये FHD+ रिझोल्यूशन असून, 1080×2340 पिक्सल रिझोल्यूशन आहे. डिस्प्लेमध्ये 90Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट आहे. फोनमध्ये 800nits पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. हा फोन Android 15 आधारित आउट-ऑफ-द-बॉक्स सिस्टीमवर चालेल. याला 6 वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर आणि सिक्योरिटी अपडेट मिळतील. यामध्ये MediaTek Dimensity 6300 SoC चिपसेट आहे. यामध्ये 8GB RAM आणि 128GB स्टोरेज आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी असून, 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. कॅमेर्याची बाब सांगायची झाल्यास, या फोनमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा आहे. रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. मुख्य कॅमेरा 50MP असून, 5MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे.
सॅमसंग Galaxy F06 5G वैशिष्ट्ये –
सॅमसंग (Samsung Mobiles) Galaxy F06 5G स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच IPS LCD डिस्प्ले आहे. यामध्ये HD+ रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट आहे. यालाही 800nits पीक ब्राइटनेस मिळाली आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 SoC चिपसेट आहे. यामध्ये 6GB RAM आणि 128GB स्टोरेज आहे. फोन Android 15 आउट-ऑफ-द-बॉक्स वर कार्य करत आहे आणि 4 वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर आणि सिक्योरिटी अपडेट मिळतील. यामध्ये 5000mAh बॅटरी असून, 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. फोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये मुख्य कॅमेरा 50MP आहे आणि 2MP सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फी साठी 8MP कॅमेरा दिला आहे.
किंमत –
सॅमसंग Galaxy F16 5G स्मार्टफोन भारतात 11,499 रुपये किंमतीपासून लाँच केला जाऊ शकतो. तसेच , या किंमतीत ऑफर्स समाविष्ट आहेत. सॅमसंगने Galaxy F16 ची किंमत अजून जाहीर केलेली नाही. फोनची विक्री सुरू झाल्यावर त्याची खरी किंमत उघड होईल. दुसरीकडे, Galaxy F06 5G दोन स्टोरेज वेरिएंट्समध्ये येतो. 4GB RAM आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे, तर 6GB RAM आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 11,499 रुपये आहे. हा फोन दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे – बहामा ब्लू आणि लिट व्हायोलेट. त्यामुळे हे स्मार्टफोन्स (Samsung Mobiles ) भारतात बजेट आणि 5G कनेक्टिव्हिटी शोधणार्या ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय असू शकतात.