Samsung कडून स्मार्ट TV वर धमाकेदार ऑफर; 20% कॅशबॅकसह झिरो डाउन पेमेंट

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात ऑनलाइन आणि ऑफलाइन प्लॅटफॉर्मनी होळी 2025 च्या निमित्ताने फेस्टिव सेल्सचे आयोजन केले आहे. तसेच मोठ्या टेक कंपनी सॅमसंगने (Samsung) देखील होळीच्या पार्श्वभूमीवर फेस्टिव सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये दक्षिण कोरियाची कंपनी आपल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर आकर्षक डिस्काउंट्स आणि डील्स ऑफर करत आहे. विशेषतः, काही निवडक स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर सॅमसंग ग्राहकांना आकर्षक फ्रीबीज देखील देत आहे. हा धमाकेदार सेल 5 मार्चपासून सुरू झाला असून, तो 31 मार्चपर्यंत चालू असणार आहे.

होळी 2025 च्या निमित्ताने फेस्टिव सेल्स –

सॅमसंग (Samsung) निओ क्यूएलईडी 8K स्मार्ट टीव्ही, सॅमसंग निओ क्यूएलईडी 4K स्मार्ट टीव्ही आणि सॅमसंग क्रिस्टल 4K UHD स्मार्ट टीव्हीवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे.

सॅमसंग इंडियाची अधिकृत वेबसाइट दर्शविते की कंपनी 55 इंच आणि त्यापेक्षा मोठ्या स्क्रीन असलेल्या टीव्हीवर विशेष डिस्काउंट देत आहे. तसेच, प्रीमियम सिरीज जसे की “The Frame” आणि Smart TV वर होळी सेलमध्ये सूट दिली जात आहे.

सॅमसंगच्या माहितीनुसार, या सेलमध्ये निवडक स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर 2,04,990 रुपये किंमतीचा टीव्ही किंवा 90,990 रुपये किंमतीचा साउंडबार मोफत दिला जात आहे.

या डीलला आणखी आकर्षक बनवण्यासाठी सॅमसंग 20% कॅशबॅक, झिरो डाउन पेमेंट आणि सोपे ईएमआय ऑप्शन्स ऑफर करत आहे. इच्छुक ग्राहक 2,990 रुपये प्रति महिना ईएमआय ऑप्शनवर टीव्ही खरेदी करू शकतात.

तसेच, सॅमसंग फेस्टिव सेलमध्ये स्मार्ट टीव्ही आणि साउंडबार एकत्र खरेदी केल्यावर डिस्काउंट ऑफर केला जात आहे.

सॅमसंगने सांगितले आहे की, ग्राहक 31 मार्चपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये कोणताही टीव्ही खरेदी करतांना सॅमसंग साउंडबारवर 45% पर्यंत सूट मिळवू शकतात.

डिस्काउंट्स आणि ऑफर्सचा लाभ –

ग्राहक सॅमसंगच्या (Samsung) वेबसाइट, ऑनलाइन रिटेलर्स आणि निवडक सॅमसंग स्टोअर्सवर या डिस्काउंट्स आणि ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.

सॅमसंगने घोषणा केली आहे की प्रीमियम एआय-पावर्ड स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर 20% पर्यंत कॅशबॅक ऑफर केले जात आहे.

डिस्काउंट्स व्यतिरिक्त, सॅमसंग इच्छुक ग्राहकांना 30 महिन्यांपर्यंत ईएमआय ऑप्शनसह झिरो डाउन पेमेंटची सुविधा देखील देत आहे.