Samsung : होळी बनवा आणखी रंगीत ! सॅमसंगच्या ‘या’ महागड्या फोनवर मिळतोय 57% पर्यंत डिस्काउंट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Samsung : फोन खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या गरजेनुसार वैशिष्ट्ये पाहता. काही लोक चांगला कॅमेरा शोधतात, तर काही लोक मजबूत प्रोसेसर आणि चिपसेटवर भर देतात . तर काही खरेदीदार मोबाईलच्या(Samsung) दिसण्याला प्राधान्य देतात. पण या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बजेट. कोणताही फोन विकत घेण्यापूर्वी, तो खरेदी करण्यासाठी तुम्ही बजेट ठरवले पाहिजे. तुमच्या बजेटमधला आणि चांगली वैशिष्ट्ये असलेला फोन तुम्हाला मिळाला तर ?

जर तुमचा फोन घेण्याचे बजेट 30000 रुपयांपेक्षा कमी असेल, तर आम्ही तुमच्यासाठी या बजेटमध्ये येणाऱ्या फोनची माहिती सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला एक चांगला कॅमेरा, मजबूत बॅटरी (Samsung) आणि चिपसेट मिळेल. Samsung Galaxy S21 FE 5G या फोनची मूळ किंमत 69999 रुपये आहे. मात्र या फोनवर 57% डिस्काउंट मिळतो आहे. त्यामुळे त्याची किंमत 29,999 रुपये होते.

बँक ऑफर (Samsung)

सॅमसंगचा हा Samsung Galaxy S21 FE 5G  फोन तुम्ही स्वस्तामध्ये खरेदी करू शकता फ्लिपकार्ट वर तुम्ही जर फोन घेणार असाल तर तुम्हाला 57% पर्यंत डिस्काउंट मिळतो आहे. शिवाय बँक सुद्धा ऑफर देत आहे. जर तुम्ही सॅमसंग ॲक्सिस बँक सिग्नेचर क्रेडिट कार्ड वरून खरेदी करणार आहात तर तुम्हाला 2500 रुपयांपर्यंत सूट मिळेल. तर सॅमसंग ॲक्सिस बँक इन्फिनिटी क्रेडिट कार्ड वरून जर तुम्ही हा फोन खरेदी करत असाल तर तुम्हाला पाच हजार रुपयांपर्यंतची सूट मिळेल. जर तुम्ही बँक ऑफर खरेदी करण्यासाठी वापरत असाल तर तुमची फोनची किंमत अधिकच कमी होऊन जाईल. शिवाय कुपन आणि कॅशबॅक (Samsung) ऑफरच्या मदतीने 4000 रुपये आणखी डिस्काउंट तुम्ही मिळवू शकता.

एक्सचेंज ऑफर

या फोनवर 23 हजार 800 रुपयांचा एक्सचेंज ऑफर आहे. मात्र ही गोष्ट लक्षात ठेवा की ही एक्सचेंज ऑफर (Samsung) जुन्या फोनची किंमत त्याची सध्याची कंडिशन आणि मॉडेल या सगळ्यावर आधारित असते. एक्सचेंज ऑफर मध्ये तुम्ही हा फोन आणखी कमी किमतीत खरेदी करू शकता.

स्पेसिफिकेशन्स (Samsung)

सॅमसंगच्या या फोनच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल सांगायचं झालं तर यामध्ये आठ जीबी रॅम बरोबर 128 जीबी स्टोरेज मिळेल. या फोनमध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. शिवाय यामध्ये (Samsung) तुम्हाला 12+ 12 + ८ मेगापिक्सल चा कॅमेरा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर पुढच्या बाजूला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 32 मेगापिक्सल चा कॅमेरा देण्यात आलेला आहे. या फोनमध्ये 4500 मेगा एंपियर ची लिथियम आयन बॅटरी बॅक देण्यात आलेला आहे तर स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर देण्यात आला आहे.