सॅमसंगचा Galaxy Z Fold 6 Special Edition लाँच ; पहा फीचर्स आणि किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण कोरियाच्या स्मार्टफोन निर्माता सॅमसंगने Galaxy Z Fold 6 Special Edition स्मार्टफोन लाँच केला आहे. काही महिन्यापूर्वी त्यांनी Galaxy Z Fold 6 हा फोन बाजारात आणला होता . हा नवीन फोल्डेबल फोन आधीच्या फोन पेक्षा पातळ आहे. तसेच नवीन फीचर्सने परिपूर्ण असून , लवकरच हा फोन ग्राहकांसाठी बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. तसेच यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही कुपन सवलती देखील दिल्या आहेत.

सॅमसंगचे नवीन एडिशन

या स्मार्टफोनचा डिस्प्ले सामान्य Galaxy Z Fold 6 च्या तुलनेत थोडा मोठा आहे. यात 8 इंचाचा एक्सटर्नल डिस्प्ले आणि 6.5 इंचाची इंटरनल स्क्रीन आहे. हा नवीन फोन Galaxy Z Fold 6 च्या तुलनेत 1.5 मिमी पातळ आणि तीन ग्रॅम हलका आहे. Galaxy Z Fold 6 Special Edition मध्ये 200 मेगापिक्सलचा वाइड-अँगल प्रायमरी कॅमेरा आहे. तसेच त्यांनी इतर कॅमेऱ्यांमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. नवीन एडिशनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनमध्ये 16 GB RAM आणि 512 GB स्टोरेज आहे. हा सॅमसंगच्या फीचर्स असलेल्या स्मार्टफोन्स आणि इतर डिव्हाइससाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) फीचर्स Galaxy AI देखील पाहण्यास मिळेल. तसेच हा स्मार्टफोन ग्राहकांना काळ्या रंगात खरेदी करता येईल.

सॅमसंगचे इतर मॉडेल्स

सणासुदीच्या काळात पहिल्या स्मार्टफोनची विक्री 11 टक्क्यांनी वाढली आहे. हा सेल 11 दिवस चालला होता. या सेलचा कालावधी सात ते आठ दिवसांचा असतो . स्मार्टफोनच्या विक्रीच्या दृष्टीने सॅमसंगने पहिले स्थान मिळवले आहे. त्याने सुमारे 20 टक्के मार्केट शेअर मिळवला आहे.कंपनीसाठी Galaxy M35, Galaxy S23, Galaxy A14 आणि Galaxy S23 FE हे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल्स ठरले आहेत.

फोनची किंमत

सुरुवातीला हा स्मार्टफोन फक्त दक्षिण कोरियामध्ये उपलब्ध असेल. या फोनची किंमत 2789600 KRW म्हणजे सुमारे 170000 रुपये आहे. या फोल्डेबल स्मार्टफोनची विक्री 25 ऑक्टोबरपासून सॅमसंगच्या वेबसाइट्स आणि इतर ऑनलाइन स्टोअर्सवरून होईल. Galaxy Z Fold 6 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सॅमसंगच्या Galaxy Ring, Galaxy Watch Ultra, Galaxy Buds 3 Pro आणि Galaxy Tab S10 Ultra सारख्या उत्पादनांवर सवलतीचे कूपन दिले जातील. त्यामुळे ग्राहकवर्गाला जास्त उत्सुकता लागली आहे