SangharshYoddha : ‘…गेलो, तर समाजाचा’; मनोज जरांगेंच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटाचा टिझर रिलीज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (SangharshYoddha) मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर गेले काही महिने महाराष्ट्र आणि राज्यातील राजकारण अक्षरशः ढवळून निघालं आहे. संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील संघर्ष करत आहेत. मराठ्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे भक्कम नेतृत्व म्हणून सिद्ध झाले आहेत. अशातच त्यांच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा येतो आहे. ज्याचे नाव ‘संघर्षयोद्धा’- मनोज जरांगे पाटील असे आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासून प्रेक्षकांमध्ये सिनेमाबाबत उत्सुकता आहे. यातच नुकताच ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे.

बहुचर्चित ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटाचा धमाकेदार टीजर नुकताच लाँच करण्यात आला असून येत्या २६ एप्रिल २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (SangharshYoddha) सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली आहे. तर चित्रपटाचे सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे, कार्तिक दोलताडे, नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. शिवाजी दोलताडे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. तर डॉ. सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे.

SangharshYoddha Manoj Jarange Patil - Teaser | Rohan Patil | Shhivaji Doltade | 26 April 2024

मनोज जरांगे पाटील बऱ्याच वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत आहेत. (SangharshYoddha) मात्र काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगे प्रसिद्धीस आले. त्यांचे उपोषण, भाषणे, दौरे यांना राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. मराठा समाजाच्या ताकदीचं दर्शनच या निमित्ताने झालं. मनोज जरांगे पाटील यांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे राज्य सरकारातील मंत्री, मुख्यमंत्री, अन्य नेत्यांनाही त्यांची दखल घ्यावी लागली.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेला एल्गार धमाकेदार ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाच्या टीजरमधून दिसत आहे. (SangharshYoddha) लाखोंची गर्दी, उधळला जाणारा गुलाल यामुळे आंदोलनाचा माहौल चित्रपटातही टिपला गेला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना राज्यभरातून मिळालेला तुफान प्रतिसाद या चित्रपटालाही मिळणार हे या टीजरमधून स्पष्ट होत आहे.

चित्रपटात दिसणार ‘हे’ कलाकार (SangharshYoddha)

या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. रोहन पाटीलसह या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले आणि सिद्धेश्वर झाडबुके या कलाकारांच्या देखील अत्यंत महत्वाच्या भूमिका आहेत.