Saunf Juice : बडीशेप सरबतासोबत कडक उन्हाळा बनवा रिफ्रेशिंग; उष्णतेच्या समस्या राहतील दूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Saunf Juice) कडाक्याच्या उन्हात शरीराला डिहायड्रेशनच्या समस्येचा मोठा ताप झेलावा लागतो. शरीरातील पाणी कमी झाल्यास मोठमोठे आजार होण्याची शक्यता असते. कारण यामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. परिणामी कोणताही आजार आपल्या आरोग्यावर सहज परिणाम करू शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. या दिवसात आपले शरीर डिहायड्रेट होणार नाही यासाठी आवश्यक तेव्हढे पाणी, फळांचे रस, सत्तू सरबत, वाळ्याचे सरबत, लिंबू सरबत अशी विविध पेये पिण्याचा सल्ला दिला जातो.

मित्रांनो, उन्हाळ्यात फळांचे रस आणि विविध सरबत भरपूर प्यायले असाल. पण कधी बडीशेपचे सरबत प्यायले आहात का? हे सरबत उन्हाळ्यात कोरड्या घशाला आराम देते आणि शिवाय डिहायड्रेशनची समस्या चार हात लांब ठेवते. आपल्या शरीराला आतून थंड करण्यासाठी बडीशेपचे सरबत (Saunf Juice) मोठे फायदेशीर ठरते. कारण बडीशेप स्वभावाने अतिशय थंड असते. शिवाय बडीशेपमूळे पोटाचे आरोग्य चांगले राहते. अशी ही बडीशेप सरबताचा माध्यामातून सेवन केल्यास उन्हाळ्यात मोठा फायदा होतो. आता तुम्ही म्हणाल, बडीशेपच सरबत कुठे मिळत? तर हे सरबत पिण्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. घरच्या घरी अगदी सोप्प्या पद्धतीने हे सरबत बनवता येत. कसं? ते जाणून घ्या.

साहित्य

  • बडीशेप – १/२ कप (Saunf Juice)
  • लिंबाचा रस – २ टीस्पून
  • हिरवा रंग – एक चिमूटभर
  • काळे मीठ – १ टीस्पून
  • साखर – चवीनुसार
  • बर्फाचे तुकडे – ८-१०

कृती

बडीशेपचे सरबत बनवण्यासाठी आधी बडीशेप नीट स्वच्छ करून धुवून घ्या. यानंतर २ तास पाण्यात भिजवून घ्या. यानंतर बडीशेप पाण्यातून काढून मिक्सर जारमध्ये घ्या. त्यात चवीनुसार साखर, काळे मीठ आणि पाणी घालून बारीक वाटून घ्या. एका भांड्यात सुती कापडाच्या सहाय्याने हे वाटण गाळून घ्या. (Saunf Juice) पुन्हा उरलेली बडीशेप पाणी टाकून बारीक करा आणि पुन्हा गाळून घ्या. बहुतेक रस गाळून झाला की यात चिमूटभर हिरवा रंग घालून २ चमचे लिंबाचा रस मिसळा. तयार सरबत ग्लासमध्ये काढा आणि त्यात बर्फाचे तुकडे टाकून थंडगार सरबताचा आस्वाद घ्या.

बडीशेपच्या सरबताचे फायदे (Saunf Juice)

  • डिहायड्रेशनच्या समस्येवर परिणामकारक
  • ब्लोटिंग कमी करण्यासाठी खूप प्रभावी
  • पचनाच्या समस्या होतात दूर
  • अनियमित मासिक पाळीच्या समस्येसाठी फायदेशीर
  • वाढत्या वजनावर नियंत्रण
  • त्वचेवरील मुरूम जातील आणि तेज येईल
  • अनिद्रेचा त्रास मिटेल