SBI Har Ghar Lakhpati Scheme: SBI ची ‘हर घर लखपती’ योजना; कमी बचतीतून उभी करा मोठी रक्कम

SBI Har Ghar Lakhpati Scheme
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI Har Ghar Lakhpati Scheme- देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांसाठी एक नवी आणि महत्त्वाची योजना जाहीर केली आहे. ‘हर घर लखपती’ (SBI Har Ghar Lakhpati Scheme)या नावाने सुरू करण्यात आलेली ही योजना आवर्ती ठेव (Recurring Deposit) स्वरूपात आहे . कमी बचतीतून मोठी रक्कम उभारण्याची संधी यामधून निर्माण होते . तर चला या योजनेच्या अधिक माहिती जाणून घेऊयात.

SBI चे व्याजदर –

(SBI Har Ghar Lakhpati Scheme) साधारण ग्राहकांसाठी एसबीआयमध्ये (State Bank of India) व्याजदर 6.75% आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 7.25% आहे. एसबीआयच्या कर्मचाऱ्यांसाठी विशेषत: 8% व्याज दर आहे . याशिवाय, एसबीआयने लहान मुलांसाठीही एक विशेष योजना उपलब्ध केली आहे, जी दहा वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी खुली आहे. या योजनेत, जे मुले स्वत: सही करू शकतात, त्यांना स्वत:चे खाते उघडता येते, तर इतर मुलांसाठी पालकांच्या माध्यमातून खाते उघडता येते. ही योजना मुलांच्या भविष्याचे संरक्षण करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

हप्ता उशिरा भरल्यास दंड (SBI Har Ghar Lakhpati Scheme) –

एसबीआयच्या या योजनेत (SBI Har Ghar Lakhpati Scheme) ग्राहकांना 3 ते 10 वर्षांच्या कालावधीत दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करावी लागेल. उदाहरणार्थ, 3 वर्षांसाठी महिन्याला 2,500 रुपये जमा केल्यास मॅच्युरिटीवेळी 1 लाख रुपये मिळतील. 10 वर्षांसाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हप्ता 591 रुपये इतका कमी होतो. हप्ता भरण्यास उशीर झाला तर दर 100 रुपयांच्या हप्त्यावर 1.50 ते 2 रुपये दंड आकारला जाईल. सलग सहा महिने हप्ता न भरल्यास खाते बंद होऊन बचत खात्यात उर्वरित रक्कम जमा केली जाईल.

खाते कसे उघडावे (SBI Har Ghar Lakhpati Scheme)-

ग्राहकांनी जवळच्या एसबीआय (State Bank of India) शाखेत जाऊन आवश्यक कागदपत्रांसह खाते उघडावे. मॅच्युरिटी रक्कम आणि कालावधी निवडून दरमहा जमा होणारा हप्ता निश्चित केला जातो.

लहान गुंतवणूकदारांसाठी प्रोत्साहन –

एसबीआयची ‘हर घर लखपती’ योजना (SBI Har Ghar Lakhpati Scheme) लहान गुंतवणूकदारांसाठी बचतीला प्रोत्साहन देणारी आहे. कमी गुंतवणुकीतून मोठी रक्कम उभारण्याचा मार्ग या योजनेमुळे खुला होतो. तसेच, गुंतवणुकीवर मिळणारे व्याजदरही आकर्षक आहेत.

हे पण वाचा : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ॲमेझॉनसह फ्लिपकार्टवर मोठया सेलची घोषणा