हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI Mutual Fund – गुंतवणूकदारांना कमी जोखमीचे आणि चांगला परतावा देणारे गुंतवणूक (Investment) पर्याय आवडतात. यासाठी बँकांच्या मुदत ठेव योजना आणि पोस्ट ऑफिस योजना हे चांगले पर्याय आहेत. पण गेल्या काही वर्षांत म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक वाढताना दिसत आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे म्युच्युअल फंडातील SIP (Systematic Investment Plan) हा गुंतवणूकदारांचा आवडता पर्याय ठरला आहे. सरासरी 12% वार्षिक परतावा मिळण्याची शक्यता असल्याने एसआयपी हा चांगला गुंतवणूक पर्याय मानला जातो. SBI म्युच्युअल फंडाचा स्मॉल कॅप फंड हा टॉप रिटर्न देणारा फंड म्हणून ओळखला जातो. तर चला याबदल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
टॉप रिटर्न देणारा फंड (SBI Mutual Fund )-
SBI म्युच्युअल फंडाचा स्मॉल कॅप फंड (SBI Small Cap Fund ) हा टॉप रिटर्न (Top Return) देणारा फंड म्हणून ओळखला जातो. या फंडाने 3, 5, 10 आणि 15 वर्षांच्या कालावधीत सरासरी 20% पेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे. 2009 साली सुरू झालेल्या या फंडाने 15 वर्षांत एकरकमी गुंतवणूकदारांना 18 पट नफा दिला आहे. तसेच दरमहा 10,000 रुपये एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदारांना सुमारे 1.22 कोटी रुपयांचा परतावा मिळाला आहे.
गुंतवणुकीच्या कालावधीवर नफा –
एसआयपी वर मिळालेला परतावा आपल्या गुंतवणुकीच्या कालावधीवर आधारित असतो. 3 वर्षांचा एसआयपी परतावा 22.23% आहे, तर 5 वर्षांचा परतावा 25.86% आहे. 10 वर्षांच्या कालावधीत 21.43% परतावा मिळालाय, आणि 15 वर्षांच्या कालावधीत 22.84% परतावा मिळाला आहे. या प्रकारे, जर 9 सप्टेंबर 2009 रोजी एक लाख रुपये एकरकमी गुंतवले असते, तर आज त्या गुंतवणुकीचे मूल्य 17.73 लाख रुपये झाले असते. या फंडाने 20.65% वार्षिक परतावा दिला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणुकीतून जास्त नफा मिळाला आहे. एसबीआय स्मॉल कॅप फंडामध्ये (SBI Mutual Fund) एकरकमी गुंतवणुकीसाठी किमान 5,000 रुपये आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे एसआयपीसाठी किमान 500 रुपये गुंतवले जाऊ शकतात.