SBI Mutual Fund : SBI म्युच्युअल फंड द्वारे अनेक योजना चालवल्या जात आहेत, ज्यांचे एक्सपोजर केवळ इक्विटी मध्ये नाही तर डेट मध्ये देखील आहे. SBI म्युच्युअल फंड योजनांवरील गुंतवणूकदारांचा विश्वास म्युच्युअल फंड योजनांच्या परताव्याच्या तक्त्यावरून लक्षात येऊ शकतो. SBI (SBI Mutual Fund) च्या अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत ज्यांनी 5 वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट-तिप्पट केले आहेत. या योजनांचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ ५०० रुपयांच्या एसआयपीने गुंतवणूक सुरू करता येते. अशा 5 योजनांची माहिती आज येथे आम्ही तुम्हाला देत आहोत.
एसबीआय स्मॉल कॅप फंड
एसबीआय स्मॉल कॅप फंडांना (SBI Mutual Fund) दहा वर्षातील एक रकमी गुंतवणूकदारांना वार्षिक 28.54% परतावा दिला आहे. या अर्थाने ज्याने एक लाख रुपयांची गुंतवणूक केली होती त्यांचा निधी आता 12 लाख 32 हजार 994 रुपये झाला आहे. तर दहा वर्षाचा एसआयपी परतावा वार्षिक 24.27% आहे. म्हणजे ज्यांनी दहा वर्ष दरमहा 5000 रुपये जमा केले त्यांचे फंड व्हॅल्यू 21 लाख 70 हजार 287 रुपये झाला आहे. या योजनेत किमान पाच हजार रुपये गुंतवणूक करता येते तर एसआयपी द्वारे दरमहा पाचशे रुपये जमा केले जातात.
एसबीआय मॅग्नम मिडकॅप
एसबीआय मिडकॅप फंडांना एक रकमी गुंतवणूकदारांना दहा वर्षात वार्षिक 23.62% परतावा दिला आहे या अर्थाने ज्यांनी एक लाख रुपयांची गुंतवणूक (SBI Mutual Fund) केली होती त्यांचा निधी आता आठ लाख 349 रुपये झाला आहे. तर दहा वर्षाचा एसआयपी परतावा वार्षिक 19.53% आहे. म्हणजे ज्यांनी दहा वर्ष दर महा 5000 रुपये जमा केले त्यांचे फंड व्हॅल्यू 16 लाख 79 हजार 692 रुपये झाले आहेत. या योजनेत कमीत कमी पाच हजार रुपयांची गुंतवणूक करता येते तर दरमहा पाचशे रुपये एसआयपी म्हणून जमा करण्याची सुविधा आहे.
एसबीआय लार्ज अँड मिडकॅप फंड
एसबीआय लार्ज अँड मिडकॅप फंडांना (SBI Mutual Fund) एकाच वेळी गुंतवणूक करणाऱ्यांना वार्षिक 19.52% परतावा दिला आहे. या अर्थाने ज्यांनी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली होती त्यांचा निधी आज पाच लाख 95 हजार 288 रुपये झाला आहे. तर दहा वर्षाचा एसआयपी परतावा वार्षिक 17.63% आहे. म्हणजेच ज्यांनी दरमहा पाच हजार रुपये जमा केले त्यांचे फंड व्हॅल्यू 10 वर्षात 15 लाख 15 हजार 541 रुपये झाले आहे. या योजनेत किमान एक रकमी गुंतवणूक पाच हजार रुपये आहे तर एसआयपी द्वारे दरमहा पाचशे रुपये जमा केले जाऊ शकतात
एसबीआय फोकस इक्विटी फंड
एसबीआय फोकस इक्विटी फंडांना दहा वर्षातील एक रकमी गुंतवणूकदारांना वार्षिक 19.43% परतावा दिला जात आहे. त्यानुसार ज्यांनी दहा वर्ष पूर्वी एक लाख रुपयाची गुंतवणूक केली होती त्यांचा निधी आता पाच लाख 93 हजार 922 रुपये झाला आहे. तर दहा वर्षाचा एसआयपी परतावा वार्षिक 16.73% राहिला म्हणजेच ज्यांनी दहा वर्ष दरमहा पाच हजार रुपये जमा केले त्यांचे फंड व्हॅल्यू 14 लाख 43 हजार 924 झाले या योजनेत कमीत कमी पाच हजार रुपयांची एक रकमी गुंतवणूक करता येते. तर एसआयपीच्या माध्यमातून दरमहा 500 रुपये जमा करता येतात
एसबीआय टेक अपॉर्च्युनिटी फंड
एसबीआय टेक ऑपॉर्च्युनिटी फंडांना (SBI Mutual Fund) दहा वर्षातील एक रकमी गुंतवणूकदारांना वार्षिक 19.37% परतावा दिला आहे. ज्यांनी दहा वर्षांपूर्वी या फंडात एक लाख रुपयांची गुंतवणूक केली त्यांचा निधी आता पाच लाख 84 हजार 861 रुपये झाला आहे. या योजनेत दहा वर्षांचा एसआयपी परतावा 20.31% आहे. म्हणजेच ज्याने दहा वर्ष दरमहा पाच हजार रुपये जमा केले त्यांचे फॉन्ट व्हॅल्यू 17 लाख 51 हजार 640 रुपये जमा झाले. या योजनेत एक रकमी पाच हजार रुपये गुंतवणूक करता येते. तर मासिक एसआयपी द्वारे दरमहा पाचशे रुपये जमा करता येतात.