Scuba Diving Maharashtra : करा समुद्राच्या दुनियेची सफर ! बजेट स्कुबासाठी ‘ही’ आहेत महाराष्ट्रातली प्रसिद्ध ठिकाणं

Scuba Diving Maharashtra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Scuba Diving Maharashtra : जमिनीच्या वरचं जसं जग आहे तसेच पाण्याच्या (Scuba Diving Maharashtra) आतील सुद्धा एक सुंदर जग आहे. पाण्याच्या आतील हे जग अतिशय सुंदर आहे यात काहीच शंका नाही. होय आम्ही बोलत आहोत समुद्राच्या पोटातल्या सुंदर अशा निसर्ग सौन्दर्याबद्दल… समुद्राच्या पोटातली ही सुंदर दुनिया पाहायची असेल तर त्यासाठी एकदा तरी स्कुबा डायव्हिंग कराच…

आता स्कुबा डायव्हिंग करायचं म्हंटल तर कुठे जायचं ? असा प्रश्न निर्माण होतो. मात्र महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्रात स्कुबाचा अप्रतिम अनुभव घेण्यासाठी बरीच ठिकाणं उपलब्ध आहेत. आज आपण याच ठिकणांबद्दल जाणून घेणार आहोत. शिवाय स्कुबा कसा केला जातो ? त्यासाठी किती खर्च येतो ? या सगळ्याची देखील महिती आपण आजच्या लेखात घेणार आहोत. अंथांग सागरी किनारा आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणात स्कुबा डायव्हिंग अनुभव घेता येवू शकतो. मुंबई, पुण्यापासून (Scuba Diving Maharashtra) आठ ते नऊ तासांत कोकणात जाता येते. चला तर मग समुद्राच्या पोटतिल दुनियेची सफर करायला…

कसा केले जाते स्कुबा डायव्हिंग ? (Scuba Diving Maharashtra)

स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी तुम्हाला आधी खास प्रशिक्षण दिले जाते. पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर लावला जातो. शिवाय तुमच्या सोबत स्कुबा डायव्हर्स सुद्धा असतात. स्कुबा करण्याआधी तुमच्याकडून एक फॉर्म भरून घेतला जातो. डीप स्कुबा साठी चार्जेस वेगळे असतात. स्कुबा करीत असताना पाण्याचा दबाव जास्त असल्याने प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते की त्याला किती वेळ पाण्यामध्ये थांबायचे आहे. स्कुबा करायला जाताना कानामध्ये घालण्यासाठी प्लग मिळतात ते आवश्य घेऊन जा. स्कुब किट ला असलेले इमर्जन्सी बटन असते जे दाबल्यावर तुम्ही फास्ट पाण्यावर जाऊ शकता.

१) मालवण

स्कुबा साठी मालवण हा नंबर १ पर्याय आहे. त्याचं कारण म्हणेज स्वच्छ पाणी (Scuba Diving Maharashtra) आणि अप्रतिम जैवविविधता इथल्या समुद्रात आहे. अगदी १५ ते २० फुटांवर सुद्धा इथे तुम्हाला सुंदर मासे आणि प्रवाळ दिसू शकतात. पॅकेजच्या बाबतीत बोलायचं झालं तर मालवण मध्ये इतर साहसी प्रकार आणि स्कुबा असे पॅकेज दिले जाते. शिवाय तुम्ही निव्वळ स्कुबा देखील करू शकता. पॅकेज ची किंमत ५००० रुपयांपर्यंत जाते. तर केवळ स्कुबा करायचा झाल्यास प्रति व्यक्ती १५०० पासून पुढे तुम्हाला स्कुबा करता येतो. मालवण तारकर्ली भागात स्कुबा करण्याचा फायदा म्हणजे येथे कमी किमतीत स्कुबा करू शकता. व्हिजन चांगले मिळते. म्हणेज अगदी खोलवर न जाता तुम्ही समुद्री नजारा पाहू शकता.

२)तारकर्ली

तारकर्लीचा समुद्र उथळ आहे. अगदी तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर जरी (Scuba Diving Maharashtra) फेरफटका मारला तरी जिवंत शंख , शिंपले पायात येतील . शिवाय खेकडे , स्टार फिश सुद्धा दिसतील. अगदी जास्त खोलीवर न जाता तुम्ही तारकर्लीला स्कुबा करू शकता.

३) रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील मिऱ्या समुद्र किनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंगचा (Scuba Diving Maharashtra) अनुभव घेता येईल. रत्नागिरी हे सिंधुदुर्गच्या तुलनेत मुंबई पुण्यापासून जवळ आहे. मात्र, येथे जाताना चौकशी करुन जावे.

४) वेंगुर्ला (Scuba Diving Maharashtra)

वेंगुर्ला समुद्र किनाऱ्या गोव्यापासून अगदी जवळ आहे. येथे पर्यटकांची फार गर्दी नसते. यामुळे स्कुबा डायव्हिंगचे हे ठिकाण एकदम बेस्ट ऑप्शन आहे.