आपलं सुंदर घर असावं आणि आपल्या घरात छोटासा का होईना सुंदर बगीचा असावा असं सगळ्यांनाच वाटतं मात्र आता जमिनीची कमतरता असल्यामुळे फ्लॅट सिस्टीम घरांमध्ये सुंदर बाग बनवणं शक्य नसलं तरी बाल्कनी मध्ये विविध प्रकारची झाडं लावून तुम्ही तुमच्या बागेची स्वप्न पूर्ण करू शकता. पण अनेकदा घरामध्ये नर्सरी मधून झाडे आणली की ती काही वेळ त्याला फुलं येतात मात्र त्यानंतर मात्र त्याला फुलं येणं बंद होऊन जातं. खास करून जास्वंदीच्या झाडाबाबत हे होतच होतं म्हणूनच आम्ही आजच्या लेखांमध्ये तुम्हाला जास्वंदीच्या झाडासाठी (Garden Tips) एक असा उपाय सांगणार आहोत ज्याच्यामुळे तुमचा जास्त फुलांनी बहरून जाईल चला तर मग जाणून घेऊया…
रॉक फॉस्फेट
रॉक फॉस्फेट चा वापर करून तुमच्या झाडाची वाढ चांगली होऊ शकते. रॉक फॉस्फेट हे पाण्यात विरघळतं. याचा वापर कुंडीतल्या मातीत केल्यास फुलांची योग्य वाढ होते. यामध्ये असणारा नायट्रोजन आणि पोटॅशियम झाडाच्या योग्य वाढीसाठी मदत करत. आता ते कसं वापरायचं जाणून घेऊयात… रॉक फॉस्फेट चा वापर करण्यासाठी एक लिटर पाणी घ्या. त्यामध्ये रॉक फॉस्फेट घालून मिक्स करा. तयार पाणी कुंडीतल्या मातीत मिसळा आपण या पाण्याचा वापर महिन्यातून एकदा करू शकतो रफ फॉस्फेटच्या गुणधर्मामुळे झाडांवर नवी फुल येतात.
कांद्याची टरफलं
जर तुमच्याकडे रॉक फॉस्फेट नाहीये तर चिंता अजिबात करू नका कारण कांद्याचा टरफलांचा वापर सुद्धा झाडाला चांगली फुले येण्यासाठी आपण करू शकतो. कांद्याच्या सालीमध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, सल्फर यासारखे अनेक घटक जास्त प्रमाणामध्ये असतात कांद्याच्या सालीचा वापर केल्याने झाडाला बहर येतो. हा उपाय करण्यासाठी कांद्याच्या सालीचे पाणी तयार करा कांद्याच्या सालीचा वापर केल्याने झाड बहरते. दोन ते तीन मग पाणी झाडाच्या कुंडीत तुम्हाला मिसळायांचे आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही मातीमध्ये लिक्विड घालाल तेव्हा माती थोडी कोरडी असणं आवश्यक आहे.