भारतात सोन्याला किती पसंती आहे हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. विशेषतः स्त्रियांमध्ये सोन्याची खूप लोकप्रियता आहे. अगदी काही दिवसांतच लग्न साराईला सुद्धा सुरुवात होईल. त्यामुळे या काळात सोन्याच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल असतो. दिवाळीच्या सीझनमध्ये सुद्धा महाग असूनही सोन्याच्या दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळाली. आता सोने खरेदीदारांकरिता खुशखबर आहे. कारण काल आणि आज सोन्याच्या दारात घसरण झालेली पहायला मिळत आहे. चला पाहुयात आजचे सोन्याचे दर..
1 ग्रॅम सोन्याचा दर
भारताच्या बाबतीत विचार करायचा झाला तर आज दिनांक 8 नोव्हेंबर 2024 रोजी 22 कॅरेट सोन्याचा एक ग्रॅम चा दर 7285 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा एक ग्रामचा दर 7947 रुपये इतका आहे. तर 18 कॅरेट एक ग्रॅम सोन्यासाठी आज तुम्हाला 5,961 रुपये मोजावे लागतील.
10 ग्रॅम सोन्याचा दर
जर तुम्हाला 22 कॅरेट 10 gm सोनं खरेदी करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 72 हजार 850 रुपये मोजावे लागतील. तुम्हाला 24 कॅरेट 10 gm सोनं खरेदी करायचं असेल तर 79,470 रुपये इतका दर भारतामध्ये सध्या घेतला जातोय. तर दुसरीकडे 18 कॅरेट दहा ग्रॅम सोनं तुम्हाला खरेदी करायचा असेल तर त्याचा आजचा दर 59,610 इतका आहे.
चांदीची किंमत
चांदीच्या किमती बद्दल सांगायचं झाल्यास सोन्याच्या किमती बरोबरच चांदीच्या किमतीत सुद्धा घसरण झाल्याची पाहायला मिळते आहे. 100 ग्रॅम चांदीची किंमत 9290 इतके आहे. तर एक किलो चांदीची किंमत 92 हजार 900 रुपये इतके आहे चांदीची किंमत काही दिवसांपूर्वी एक लाख यांच्यावर गेले होते चांदीची किंमत आज 100 रुपयांनी कमी आली आहे.
म्हणून सोन्याच्या दरात घसरण
आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याचं कारण म्हणजे नुकत्याच अमेरिकेमध्ये पार पडलेल्या राष्ट्रपतीपदाची निवडणूका आहेत. या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकी जनतेने राष्ट्रपती म्हणून निवडले आहे. त्यानंतर लगेचच सोन्याच्या दरामध्ये उतार व्हायला सुरुवात झाली आहे. अमेरिकी केंद्रीय बँक द्वारा व्याजदरात 0.25 टक्के कपात केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनी कंट्रोल ने दिलेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर गुंतवणुकीचा प्रवाह जोखीम असलेल्या संपत्ती म्हणजेच बिटकॉइन, शेअर बाजार यांच्याकडे जास्त असल्याने सोन्यातील गुंतवणुकीकडे नागरिकांचा कल घटला आहे आणि म्हणूनच सोन्याच्या दरामध्ये घसरण झाल्याची माहिती आहे.