हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज बरेच लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असून , यामध्ये प्रचंड धोका पत्करावा लागतो. त्यामुळे अनके ज्येष्ठ नागरिक मुदत ठेवी (Fixed Deposits FD) हा सुरक्षित पर्याय म्हणून निवडतात. सध्याच्या घडीला अनेक खाजगी बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी सामान्य ग्राहकांच्या तुलनेत 0.25 % ते 0.50 % जास्त व्याजदर उपलब्ध करून देत आहेत. जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांच्या नावावर एफडी करण्याचा विचार करत असाल , तर तुमच्यासाठी हि सुवर्ण संधी ठरू शकते. या भक्कम व्याजदरामुळे त्यांना भविष्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत.
ज्येष्ठ नागरिकांसाठी FD व्याजदर –
वर्तमान काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक एफडीवरील व्याजदर आकर्षक झाले आहेत. बंधन बँक 8.55 % पर्यंत व्याज देत आहे, जे 1 वर्षासाठी उपलब्ध आहे. 3 आणि 5 वर्षांसाठी बंधन बँकने दिलेले व्याजदर अनुक्रमे 7.75 % आणि 6.60 % आहेत. डीसीबी बँक 1 वर्षासाठी 7.60 %, 3 वर्षांसाठी 8.05 %, आणि 5 वर्षांसाठी 6.00 % दर देत आहे, तर एसबीएम बँक 8.75 % पर्यंतचा उच्च दर 1 वर्षासाठी देत आहे, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आकर्षक पर्याय मिळतो. तसेच आरबीएल बँक 8.60 % पर्यंतचा व्याजदर देत आहे, जो 1 वर्षासाठी 7.60 % आणि 5 वर्षांसाठी 8.25% आहे.
चांगले व्याजदर उपलब्ध –
इतर बँकांमध्येही चांगले व्याजदर उपलब्ध आहेत. इंडसइंड बँक 1 वर्षासाठी 8.25%, 3 व 5 वर्षांसाठी 7.75% व्याज देते. येस बँक 1 वर्षासाठी 7.75%, तर 5 वर्षांसाठी 8.25% व्याज देत आहे. तामिळनाडू मर्कटाइल बँक 5 वर्षांसाठी 7.71%, आणि आयडीएफसी फर्स्ट बँक 3 वर्षांसाठी 7.30% आणि 5 वर्षांसाठी 7.25% व्याजदर देत आहे. ज्येष्ठ नागरिकांनी या विविध बँकांच्या व्याजदरांची तुलना करून योग्य बँकेचा आणि मुदतीचा कालावधी निवडून एफडी करणे फायद्याचे ठरू शकते.