Senior Citizens FD : ज्येष्ठांची ‘या’ योजनेतील गुंतवणूक सरकारच्या पत्थ्यावर; 27000 कोटींची कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Senior Citizens FD) आज केलेली गुंतवणूक की भविष्यातील आर्थिक सहाय्यक पूल आहे, ही बाब आता प्रत्येकाच्या लक्षात आली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस गुंतवणुकीचं महत्व मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. प्रत्येक व्यक्ती आजच्या घडीला भविष्यातील आर्थिक सुविधेचा विचार करत आहे. त्यामुळे गुंतवणूक ही सर्वसामान्यांसाठी देखील प्राधान्याची बाब ठरली आहे. यामध्ये देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील एकापेक्षा एक सरस योजना राबविल्या जात आहेत. यातील FD योजनेला सर्वाधिक पसंती दिली जातेय. कारण यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना इतरांपेक्षा अधिक व्याजदर दिला जातो. दरम्यान, याचा फायदा आता सरकारला देखील होताना दिसतोय. तो काय? याविषयी जाणून घेऊ.

ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर ठरते FD (Senior Citizens FD)

ज्येष्ठ नागरिकांना सर्व FD योजनांमध्ये इतरांपेक्षा ०.५० टक्के अधिक व्याजदर मिळतो. ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी FD मध्ये गुंतवणूक करणे निश्चित स्वरूपात कायद्याचे ठरते. दरम्यान सर्व बँकांनी FD वरील व्याजदरात वाढ केल्याने सामान्य गुंतवणूकदारांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फायदा होतो आहे.

मात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी FD (Senior Citizens FD) मधील गुंतवणूक जशी त्यांच्या फायद्याची तशी सरकारसाठी देखील फायद्याची ठरते आहे. कारण जेष्ठ नागरिकांनी ठेवलेल्या मुदत ठेवीच्या माध्यमातून सरकारला मोठा फायदा मिळतोय. या अंतगत सरकारने ज्येष्ठ नागरिकांकडून वर्षभरात मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर २७,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.

FD च्या व्याजातून सरकारची कोट्यवधीत कमाई

जेष्ठ नागरिकांनी FD मध्ये गुंतवणूक केली असता त्यावर बँका चांगला व्याजदर आणि चांगला परतावा देत आहेत. दरम्यान सरकारने देखील ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. ज्यांचा नागरिक पुरेपूर लाभ घेत आहेत. दरम्यान, सरकार देखील या योजनांच्या माध्यामातून फायद्यात असल्याचे समजत आहे.

(Senior Citizens FD) जसे की, जेष्ठ नागरिकांनी ठेवलेल्या मुदत ठेवीवरील व्याजाचा सरकारला मोठा फायदा होत आहे. FD मधून जेष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या उत्पन्नावर सरकारमार्फत कर लादला जातो. यातून सरकारची कमाई होत असते. स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवीवर व्याजातून वर्षभरात सरकारने २७,००० कोटी रुपयांची कमाई केल्याचे समोर आले आहे.

देशभरातील एकूण मुदत ठेव खात्यांची संख्या किती?

गेल्या काही काळात जेष्ठ नागरिक मुदत ठेवीत मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवत असल्याचे दिसून आले आहे. ज्यामुळे वर्षभरात मुदत ठेवींच्या रकमेत साधारण १४३% इतके वाढ झाल्याचे समजत आहे. मुदत ठेवीवर चांगला व्याजदर असल्यामूळे याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढताना दिसतोय. (Senior Citizens FD) परिणामी आजच्या घडीला FD योजनेला सर्वाधिक लोकप्रियता मिळताना दिसते आहे. इतकंच नव्हे तर, सध्या देशभरात मुदत ठेव खात्यांची संख्या ही ७.४ कोटी इतकी असून यामध्ये १५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा असल्याचे समजत आहे.