सलमान खाननंतर आता शाहरुख खानलाही जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक

SRK
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्याच्यानंतर आता सुपरस्टार शाहरुख खानचेही नाव या प्रकरणात सामील असल्याची बातमी येत आहे, ज्याला रायपूरमधील एका व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस सतर्क झाले असून धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. आरोपीने अभिनेत्यानकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती.

शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी

मिळालेल्या माहितीनुसार, 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:21 वाजता शाहरुख खानच्या नावाने वांद्रे पोलिसांना धमकीचा कॉल आला होता. कॉलर म्हणाला की , “बँड स्टँड असलेला शाहरुख खान मन्नत मध्ये आहे ना… जर त्याने मला ५० लाख रुपये दिले नाहीत, तर मग मी त्याला मारीन”. पोलिसांनी कॉलरला त्याची ओळख विचारली तेव्हा त्याचे उत्तर होते, ” माझे नाव काय आहे याने काही फरक पडत नाही… लिहायचेच असेल तर माझे नाव हिंदुस्थानी लिहा.”

शाहरुख खानने 2 नोव्हेंबरला त्याचा 59 वा वाढदिवस साजरा केला आणि आता अवघ्या 5 दिवसांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे, ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुखला ही धमकी छत्तीसगडच्या रायपूर येथील एका व्यक्तीकडून मिळाली आहे.

मन्नतची सुरक्षा वाढवली

धमकीचा फोन आल्यानंतर मुंबई पोलिसांनी शाहरुख खानच्या मुंबईतील मन्नत येथील घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे. याच प्रमाणे अभिनेता सलमान खानला सुद्धा धमक्या येऊ लागल्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.