Shahid Kapoor – शाहिद कपूर साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका; चाहत्यांमध्ये वाढली उत्सुकता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shahid Kapoor) बॉलिवूड सिनेविश्वाला ऐतिहासिक कथानकांची भुरळ पडली असून गेल्या काही काळात असे अनेक सिनेमे येऊन गेले. दरम्यान यातील काही सिनेमांनी प्रेक्षकांचे मन जिंकले. तर काही सिनेमांना हवे तसे यश मिळाले नाही. मात्र ‘पद्मावत’ या सिनेमाने प्रेक्षकांची देखील वाहवाह मिळवली आणि त्यासोबत समीक्षकांकडून देखील शाबासकी मिळवली. या सिनेमात दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत झळकले होते. यानंतर आता शाहिद कपूर पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे समोर आले आहे.

मध्यंतरीच्या काळात अनेक बॉलिवूडकरांना मराठी सिनेविश्वाची भुरळ पडल्याचे दिसले. अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतो आहे. त्याच्या या भूमिकेतील लुक सोशल मीडियावर बराच चर्चेत राहिला. यावरून बरंच ट्रोलिंगदेखील झालं. अशातच आता (Shahid Kapoor) अभिनेता शाहिद कपूरदेखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार असल्याचे समोर आल्याने त्याचा लूक पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

एका वृत्तानुसार, ‘ओह माय गॉड २’चे दिग्दर्शक अमित राय हे लवकरच एक ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहेत. हा चित्रपट महाराष्ट्राचे आद्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारलेला एक भव्य चित्रपट असणार आहे. या चित्रपटासाठी अमित रायने अभिनेता शाहीद कपूरसोबत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेबाबत बोलणी केली आहे. येत्या काळात लवकरच या प्रोजेक्ट्ची घोषणा करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी निर्मात्यांना शाहिद कपूर (Shahid Kapoor) योग्य वाटल्याचे सांगितले जात आहे.

(shahid kapoor) रिपोर्टनुसार, अद्याप या चित्रपटाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र लवकरच याबाबत अधिकृतपणे जाहीर घोषणा केली जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची जबाबदारी शाहिद कपूरवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे अभिनेता हि भूमिका उत्तमरीत्या साकारण्यासाठी मेहनत घेत आहे. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत शाहीद कसा वाटतो..? हे पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.