shaktipeeth-expressway : आपल्याला माहितीच आहे की नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात लांब समुद्री मार्ग अटल सेतूचे उदघाटन केले आहे. राज्यात रस्त्यांचे जाळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने घट्ट विणले जात आहे. मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाचे काम सुद्धा अंतिम टप्प्यात आले आहे. हा महामार्ग तब्बल ७०१ किमी लांबीचा आहे. त्यानंतर आणखी एक मोठा महामार्ग तयार होत आहे. तो म्हणजे शक्तीपीठ महामार्ग (shaktipeeth-expressway) नागपूर ते गोवा दरम्यान शक्तीपीठ एक्सप्रेस वे तयार होणार आहे.
हा एक्सप्रेस वे (shaktipeeth-expressway) तयार करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. ते म्हणजे प्राधिकरणाने या नव्याने विकसित होणाऱ्या मार्गासाठी आवश्यक असलेले अंतिम संरेखन अर्थातच अलाइनमेंट नुकतेच पूर्ण केले आहे.यानुसार या महामार्गाची लांबी 805 किलोमीटर एवढी राहणार आहे. सुरुवातीला अंदाजीत अलाइनमेंट सादर करण्यात आले होते यामध्ये या मार्गाची लांबी 760 किलोमीटर राहील असे बोलले जात होते. परंतु हा एक ढोबळमानाने लावलेला अंदाज होता.
विशेष म्हणजे आता या अंतिम अलाइनमेंटला मंजुरीसाठी राज्य शासनाकडे (shaktipeeth-expressway) पाठवले जाणार आहे. दुसरीकडे या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा येत्या सहा महिन्यात पूर्ण होईल आणि नंतर या आराखड्याला राज्य शासनाची मंजुरी घेतली जाईल अशी माहिती संबंधितांच्या माध्यमातून समोर येत आहे.
आगामी शक्तीपीठ द्रुतगती मार्ग (shaktipeeth-expressway) नागपूर आणि गोवा दरम्यानच्या प्रवासात क्रांती घडवून आणेल, सध्याचा 21 तासांचा प्रवास साधारणपणे 7 तासांवर आणणार आहे. या ग्रीनफील्ड प्रकल्पाचे उद्दिष्ट पूर्व, पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातील तीन शक्तीपीठे, दोन ज्योतिर्लिंगे आणि तीर्थक्षेत्रे यांना जोडण्याचे आहे. पर्यावरणीय शाश्वततेच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, सरकारने नागपूर-गोवा द्रुतगती मार्गावर हजारो झाडे, झाडे आणि झुडपे लावण्याची योजना आखली आहे, ग्रीन कॉरिडॉर तयार केला आहे. प्रकल्पाच्या सर्वसमावेशक दृष्टीकोनाचा उद्देश केवळ प्रवास सुधारणे नाही तर उत्तर गोवा आणि नागपूर दरम्यान पर्यटन आणि तीर्थयात्रा वाढवणे देखील आहे.