Shaktipeeth Expressway : नागपूर – गोवा शक्तिपीठ एक्स्प्रेस-वे ‘या’ जिल्ह्यांमधून जाणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Shaktipeeth Expressway : समृद्धी महामार्गानंतर आता राज्यात आणखी एका मोठ्या महामार्गाची सर्वत्र चर्चा आहे हा महामार्ग म्हणजे नागपूर – गोवा शक्तिपीठ एक्स्प्रेस-वे . याचा रस्त्याबाबतची आढावा बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत या मार्गाचे संरेखन आणि आराखडा शक्य तितक्या लवकर मंजूर करून कामाचा वेग वाढवावा असे निर्देश दिले.

21 तासांचा प्रवास 11 तासांवर येणार

MSRDC ने या शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट म्हणजे संरेखन अखेर निश्चित केले आहे. या अलाइनमेंटनुसार ‘शक्तिपीठ’ (nagpur -goa shaktipeeth expressway) मार्ग आता 760Km ऐवजी 805Km किमी लांबीचा असणार आहे. मुंबईतील सह्याद्री अतिविगृह इथे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पवनार ते पात्रादेवी (नागपूर- गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाचे (Shaktipeeth Expressway) सादरीकरण करण्यात आले. या मार्गाचा एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नागपूर ते गोवा हा सद्यस्थितीला 21 तासांचा प्रवास हा साधारणतः निव्वळ अकरा तासांवर येणार आहे. या महामार्गाचे संरक्षण तातडीने पूर्ण करावे रस्ते दर्जेदार करण्यासोबतच रस्त्यांचा देखभाल व दुरुस्ती खर्च शून्य होण्यासाठी जास्तीत जास्त रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात यावेत त्यामुळे रस्त्यांचा दर्जा राखला जाऊन पुढील 30 40 वर्ष रस्त्यांच्या कामावरील खर्चाला आळा बसेल असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

‘या’ जिल्ह्यांमधून जाणार मार्ग (Shaktipeeth Expressway)

दरम्यान शक्तीपीठ एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यातून पुढे कोकण द्रुतगती महामार्गास गोवा महाराष्ट्र सरहद्दीवर जोडण्यात येणार आहे.

राज्यातील 19 तीर्थक्षेत्रांना जोडणार महामार्ग

राज्यातील तीन शक्तीपीठ दोन ज्योतिर्लिंग आणि दत्तगुरूंची पाच धार्मिक स्थळांसह पंढरपूर सह एकूण 19 तीर्थक्षेत्रांना हा महामार्ग जोडणार आहे. या महामार्गामुळे राज्यातील प्रमुख शक्तीपीठ माहूर तुळजापूर आणि कोल्हापूर तसेच मराठीतील आद्यकवी मुकुंदराज स्वामींचे व जोगाई देवीचे आंबेजोगाई औंढा नागनाथ व परळी वैजनाथ ही दोन ज्योतिर्लिंग महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले (Shaktipeeth Expressway) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर तसेच कारंजा, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही दत्तगुरूंची धार्मिक स्थळ ही सोडली जातात. या महामार्गामुळे पर्यटन आणि दळणवळण व औद्योगिक विकास गतिमान होऊन विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र व कोकण हे विभाग एकमेकांना जोडले जाऊन सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणार आहे.

शक्तिपीठ महामार्गामुळे (Shaktipeeth Expressway) दळणवळण गतिमान झाल्याने परिसराचा विकास नियोजन पूर्वक व वेगाने साध्य करता येईल असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितला यावेळी अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी महामार्गाच्या कामाचा सादरीकरण केलं. या महामार्गाची लांबी 802 किलोमीटर असून भूसंपादनासह खर्च 86 हजार 300 कोटी रुपये एवढा अपेक्षित आहे यासाठी साधारण 9385 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे.