Shaniwar Wada : पुण्यातील ‘हा’ वाडा आहे तरुण राजपुत्राच्या हत्येचा साक्षीदार; आजही ऐकू येतात भीषण किंकाळ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shaniwar Wada) जगभरात अनेक ठिकाण अशी आहेत ज्यांच्याबाबत विविध कथा प्रचलित आहेत. यांपैकी अनेक वास्तू आपल्या महाराष्ट्रात आहेत. यातील काही पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत. तर काही ठिकाणी लोक रात्री काय सकाळीसुद्धा फिरकत नाहीत. आपल्या महाराष्ट्रातील पुणे हे एक असे शहर आहे जिथे कशाचीच कमी नाही. विद्येचं माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्याला ऐतिहासिक वास्तूंचा मोठा वारसा लाभलेला आहे.

पुण्यामध्येच पेशव्यांचा थरकाप उडवणाऱ्या इतिहासाची साक्ष देणारा एक वाडा आहे. जिथे एका तरुण राजपुत्राचा मृत्यू झाला होता. आजही तो राजकुमार आपल्या बचावासाठी पुकार लगावतो अशी या वाड्याची आख्यायिका आहे. चला तर जाणून घेऊया या पछाडलेल्या वाड्याविषयी.

पछाडलेला ‘शनिवार वाडा’ (Shaniwar Wada)

पुण्यातील ‘शनिवार वाडा’ ऐतिहासिक वारसा लाभलेली भव्य वास्तू आहे. त्यामुळे हा वाडा पाहण्यासाठी नेहमीच अनेक पर्यटक येत असतात. या वाड्यात ऐतिहासिक वास्तूच्या अवशेषांपासून ते दिल्ली दरवाजा, खिडकी दरवाजा, गणेश दरवाजा, नारायण दरवाजा आणि मस्तानी दरवाजा असे पाच दरवाजे आहेत जे पर्यटकांना भुरळ घालतात. मात्र, हा लक्षवेधी शनिवार वाडा एका आत्म्यानं पछाडलेला आहे, असे सांगितले जाते. हा आत्मा कुणाचा आणि ही गोष्ट नेमकी काय आहे ते आपण जाणून घेऊया.

कोणी बांधला शनिवारवाडा ?

पेशवे हे मराठा साम्राज्याचे वंशपरंपरागत प्रशासक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या अटकेपार पराक्रमाची इतिहासात नोंद आहे. पेशव्यांनीच त्या काळी पुण्यात बांधलेला शनिवारवाडा आज पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. (Shaniwar Wada) इतिहासात नमूद केल्याप्रमाणे, पहिल्या बाजीरावांचा पुण्याच्या इतिहासात आणि संस्कृतीवर सर्वाधिक प्रभाव होता. त्यांनीच हा भव्य शनिवारवाडा बांधल्याचे सांगितले जाते. शनिवार वाडा १७३६ मध्ये उभारण्यात आला होता. त्यावेळी आजूबाजूला बरेच वाडे आणि गडकिल्ले होते असेही यात म्हटले आहे.

पेशव्यांच्या इतिहासाचा साक्षीदार

शनिवारवाड्याने पेशव्यांचा केवळ गौरवशाली इतिहास पाहिलेला नाही. तर या शनिवारवाड्याने प्रशासकांचा कारभार आणि पेशव्यांचे पतन देखील पहिले आहे. या वाड्याने अनेक भीषण मृत्यू सुद्धा पाहिले आहेत. त्यांपैकी एक म्हणजे १० वा पेशवा नारायणराव. (Shaniwar Wada)

नारायण रावांची हत्या

पेशव्यांपैकी १० वा पेशवा अर्थात १८ वर्षीय नारायणराव. ज्यांच्या कोवळ्या वयात वारसा हक्काने पेशवे पद मिळाले होते. मात्र हे अनेकांच्या पोटदुखीचे कारण बनले. ज्यात नारायणराव यांचे काका रघुनाथराव आणि त्यांची पत्नी आनंदीबाई यांचा समावेश होता. (Shaniwar Wada) नारायणराव यांना पेशवाईचं सिंहासन काय मिळालं दुसरीकडे त्यांच्याच काकाने म्हणजे रघुनाथराव आणि त्यांच्या पत्नी आनंदीबाईंनी १० व्या पेशव्याच्या हत्येचा कट रचला. गारद्यांच्या मदतीने रघुनाथरावांनी कोवळ्या वयातच नारायणराव यांना ठार मारले.

शनिवार वाड्याची भयानक आख्यायिका

येथील स्थानिक आख्यायिकांनुसार, शनिवारवाडा हा १० वा पेशवा नारायणराव यांच्या भयंकर हत्येचा साक्षीदार आहे. त्यावेळी नारायणराव याना कटकारस्थान करून मारण्यात आले याचा एकमेव पुरावा म्हणजे शनिवारवाडा. कोवळ्या वयात निष्पाप नारायणराव यांचा जीव शनिवार वाड्यातच घेतला गेला आणि म्हणून आजही शनिवारवाड्याच्या परिसरात नारायणराव यांच्या भीषण किंकाळ्या ऐकू येतात. येथिक अनेक स्थायिकांनी नारायणरावांच्या भयानक किंकाळ्या ऐकल्या असल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच सायंकाळी उशिरा शनिवार वाड्यात जाण्यास सक्त मनाई आहे. (Shaniwar Wada)