Sharad Pawar NCP List: अभिनेत्री स्वरा भास्करच्या पतीला शरद पवार गटाकडून उमेदवारी ; पक्षाकडून आणखी एक यादी जाहीर

sharad pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Sharad Pawar NCP List: महाराष्ट्रातील राजकारण म्हणजे गुंतागुंतीचे राजकारण इथे पुढच्या क्षणाला काय होईल याचा काही नेम नाही. अशातच अत्यंत मातब्बर राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळख शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणाला विधासभेचे तिकीट मिळणार याकडे सम्पूर्ण देशाचे लक्ष लागून होते. अशातच आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने (Sharad Pawar NCP List) तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांना पक्षाने तिकीट दिले आहे.

राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीतील 9 उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत. त्यात शरद पवार गटाने फहाद अहमद यांना अणुशक्ती नगरमधून उमेदवारी दिली आहे. फहाद अहमद हे सपामध्ये होते, पण आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत अभिनेत्री स्वरा भास्कर सहभागी झाली होती. इतकंच नाही तर राहुल गांधी मुंबईत पदयात्रेला निघाले होते, तेव्हाही स्वरा भास्कर सहभागी झाली होती. तेव्हा त्यांच्या मोठ्या चर्चा रंगल्या होत्या.

तिसऱ्या यादीत या 9 उमेदवारांना स्थान (Sharad Pawar NCP List)

कारंजा – ज्ञायक पाटणी
हिंगणघाट – अतुल वंदिले
हिंगणा – रमेश बंग
अनुशक्तीनगर – फहाद अहमद
चिंचवड – राहुल कलाटे
भोसरी – अजित गव्हाणे
माजलगाव – मोहन बाजीराव जगताप
परळी – राजेसाहेब देशमुख
मोहोळ – सिद्धी रमेश कदम

आतापर्यंत 76 उमेदवारांची घोषणा (Sharad Pawar NCP List)

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ उमेदवार जाहीर केल्यानंतर एकूण उमेदवारांची संख्या 76 वर पोहोचली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पहिल्या यादीत 45 तर दुसऱ्या यादीत 22 उमेदवार जाहीर केले होते. महाविकास आघाडीचे तीन घटक पक्ष ९०-९० जागांवर लढण्याची शक्यता आहे. उर्वरित 18 जागा मित्रपक्षांमध्ये वाटल्या जातील. अशा स्थितीत राष्ट्रवादीकडून (शरदचंद पवार) अजून १४ उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांच्या समर्थनार्थ अणुशक्ती नगरमध्ये एका सभेला संबोधित (Sharad Pawar NCP List) केले होते.