Shocking News : एका घरात होती.. 26 पिल्ले सापाची; भिलगाव कामठीतील घटनेनं खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shocking News) सोशल मीडियावर कायम विविध किस्से, गोष्टी, कथा आणि व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. यातील बरेच विषय हे डोक्याला मुंग्या आणणारे असतात. तर काही विषय खळबळजनक तर काही हादरा देणारे असतात. अशाच एका घटनेबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एका घरात एक दोन नव्हे तर तब्बल २६ साप आढळल्याची घटना घडली असून याबाबत सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. हे साप कुठे आणि कोणाच्या घरी सापडले? याबाबत अधिक माहिती घेऊया.

कामठी येथील खळबळजनक घटना (Shocking News)

कामठी येथील बिसन गोंडाणे यांच्या घरी एक- दोन नव्हे तब्बल २६ साप आढळल्याची खळबळजनक बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरत आहे. त्यांच्या घरात सापाची पिल्ले सापडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. दरम्यान, त्यांनी सर्पमित्रांना घरी बोलावून सर्व सापांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. ही घटना २४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी साडेदहा वाजता घडल्याची माहिती मिळत आहे. वाइल्डलाईफ वेलफेअर सोसायटीचे सदस्य सर्पमित्र सागर चौधरी यांना २४ एप्रिल रोजी सकाळी भिलगाव कामठी येथील बिसन गोंडाणे यांनी घरात साप दिसून आल्याच्या घटनेची माहिती दिली.

भ्रमणध्वनीवरून माहिती मिळताच सर्पमित्र सागर चौधरी हे तडक बिसन गोंडाणे यांच्या घरी पोहोचले. यानंतर त्यांनी सापांना पकडण्यास सुरुवात केली. (Shocking News) यावेळी जमिनीतून थोडा गाळ आणि कचरा काढल्यानंतर सागर यांच्या दृष्टीस अनेक साप एकत्र असल्याचे पडले. त्यानंतर खूप काळजीने आणि मेहनतीने त्यांनी एक एक करून तब्बल २६ साप पकडले. या सर्व सापांना एका प्लॅस्टिकच्या बरणीत भरून त्यांनी गोंडाणे कुटुंबीयांची सुटका केली.

हे साप विषारी होते का?

मिळालेल्या माहितीनुसार, सागर चौधरी यांनी पकडलेले २६ साप हे पांदीवड प्रजातीचे होते. हे साप बिनविषारी असल्याचे देखील माहिती देण्यात आली आहे. तसेच सापाच्या या २६ पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. (Shocking News)

सर्प तज्ञांच्या म्हणण्यानुसार,

या घटनेबाबत बोलताना सर्पतज्ञांनी यांनी सांगितले की, पावसाच्या दिवसात सापाच्या वारुळात पाणी आणि माती जमा होते. ज्यामुळे ते नवीन अधिवास शोधण्याच्या हेतूने वारुळातून बाहेर पडत असतात. दरम्यान, उन्हाळा असला तरी गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे सापाच्या वारुळात पाणी शिरल्याने हे साप नवीन अधिवासाच्या शोधात बाहेर निघाले असतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Shocking News) तसेच थंड वातावरणामुळे ते वारुळातून बाहेर निघून अशा घरांमध्ये शिरल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.