Shocking Video : तरुणाचा ओव्हरहेड वायरला स्पर्श करून आत्महत्येचा प्रयत्न; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shocking Video) आजकाल तरुणांमध्ये मानसिक समस्यांचे प्रमाण फार वाढले आहे. ज्यामुळे अनेक तरुण मागचा पुढचा विचार न करता थेट जीव देण्यासारखे टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. विष पिणे, गळफास घेणे, धावत्या गाड्यांसमोर उडी मारणे, हाताच्या नसा कापणे, जिवंत जाळून घेणे असे अनेक प्रकार गेल्या काही काळात समोर आले आहेत. अशातच आता आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे. भरीस भर म्हणून या घटनांमध्ये आणखी एका घटनेचा समावेश झाला आहे.

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये या व्हिडिओचा देखील समावेश आहे. आजकाल अनेक तरुण मंडळी सोशल मीडियावर रील आणि व्हिडीओ शेअर करून हजारो लाईक्स मिळवताना दिसतात. याच व्हिडिओंमध्ये एका थरारक घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होताना दिसतो आहे. (Shocking Video) या व्हिडीओमध्ये एक तरुण रेल्वेच्या डब्यावर चढून आत्महत्या करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया x हॅण्डलवर Lavelybakshi नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. जो पाहून अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.

https://twitter.com/lavelybakshi/status/1767861110693388495

कुठे घडली घटना? (Shocking Video)

ही घटना हरयाणाच्या अंबाला रेल्वे स्थानकावर घडली आहे. एका तरुणाने ओव्हरहेड खांबावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. हा तरुण आत्महत्या करण्याच्या हेतूने रेल्वे डब्याच्या छतावर चढला. दरम्यान संभाव्य धोका ओळखून प्रवाशांनी जोरजोरात आरडाओरड सुरू केली आणि यामुळे आसपास असणाऱ्या रेल्वे कर्मचारी, पोलिस तसेच आरपीएफ जवानांचे लक्ष वेधले गेले.

परिस्थिती समजताच त्यांनी तडक नियंत्रण कक्षाला धोक्याची सूचना दिली. या व्हिडीओत स्पष्ट दिसतंय की, हा तरुण ट्रेनच्या डब्यावर चढून खांबाला लटकत असताना हाय व्होल्टेज ओव्हरहेड वायरला स्पर्श करतोय. या तारेतून वीजपुरवठा सुरू असल्यामूळे हा तरुण विजेच्या धक्क्यानं जळून जागीच खाली पडला.

तरुणाची प्रकृती गंभीर

ही घटना पाहून उपस्थितांना मोठा हादरा बसला होता. येथील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी काही वेळ गेला. एका वृत्तानुसार, या घटनेनंतर रेल्वेच्या डब्याच्या छतालाही आग लागली होती. (Shocking Video) अनेक उपस्थितांनी या घटनेचे रेकॉर्डिंग केले आहे आणि सोशल मीडियावर शेअर केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या भयानक व्हिडिओंपैकी एक आहे. या व्हिडिओतील जखमी तरुणाची काहीशी माहिती समोर आली आहे. त्यानुसार, या तरुणाचे नाव रोहित असून तो अत्यंत गंभीर जखमी असल्याचे समजत आहे.

हा तरुण छत्तीसगडमधील जांजगीर जिल्ह्यातील चंपा गावचा रहिवासी आहे. विजेचा धक्का लागल्याने रोहित रुळावर पडला आणि त्यांनतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या आरपीएफ जवानांनी तात्काळ डॉक्टरांची मदत घेतली. या तरुणाला उपचारासाठी छावणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्याची प्रकृती प्रचंड खालावल्याने त्याला पीजीआय चंदिगडमध्ये भरती करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या तरुणाने आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला? याबाबत अद्याप कुणालाही कल्पना नाही. (Shocking Video)