Shocking Video : कॅमेऱ्यात कैद झाला निसर्गाचा प्रकोप; तरुणी रील बनवताना अचानक पडली वीज; पहा शॉकिंग व्हिडीओ

Shocking Video
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shocking Video) सोशल मीडियावर विविध रिल्स बनवणाऱ्यांचा नुसता सुळसुळाट झाला आहे. ज्याला त्याला रील बनवण्याचं वेड लागलं आहे. अशातच पावसाळा सुरु होताच बरेच लोक अजब गजब व्हिडीओ बनवताना दिसू लागले आहेत. दरम्यान, अशीच एक तरुणी पावसात भिजत मस्त रील बनवत होती आणि अचानक घराच्या पत्र्यावर वीज पडल्याचा एक अत्यंत शॉकिंग व्हिडीओ व्हायरल होतो आहे. निसर्गाला दयामाया नसते.. एकदा रुद्र रूप घेतलं का मग माणसाचं काही खरं नाही… हेच काय खरं!! याची पूर्ण प्रचिती या व्हिडिओतून येते आहे.

व्हायरल व्हिडीओ (Shocking Video)

पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य दहा पटीने वाढते यात काहीच शंका नाही. पण पावसाळ्यात अनेकदा वीज कोसळण्याच्या घटना घडतात आणि यामध्ये वित्तहानी तसेच जीवितहानी झाल्याच्या बऱ्याच घटना आजपर्यंत तुमच्याही कानी पडल्या असतील. निसर्गाच्या चक्रापुढे माणसाचं काय चालणार? एकीकडे घराघरात वीजेचा वापर होत असला तरी जी वीज थेट आकाशातून कोसळते ती कुणालाही भस्म करण्याचे सामर्थ्य ठेवते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत असाच रुद्र निसर्गाचा प्रकोप कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हायरल व्हिडीओ बिहारमधला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, छान पाऊस पडत आहे. आल्हाददायक वातावरण झाले आहे. अशा वातावरणाचा मनसोक्त आनंद घेत एक तरुणी गच्चीवर नाचत रील शूट करतेय. (Shocking Video) इतक्यात विजांचा मोठा कडकडाट होतो आणि घराच्या पत्र्यावर वीज कोसळताना दिसते. सुदैवाने या घटनेत वीजेचा मारा थेट तरुणीवर झाला नाही. त्यामुळे तिचा जीव वाचला. मात्र, वीज पडताच तरुणी इतकी घाबरते की, पळतच जाते. हे दृश्य इतकं भयानक आहे की, क्षणभर डोळ्यासमोर अंधार येतोय.

किती भयानक आहे हे…

हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया X हँडलवर sdcworldoffl नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘बिहारच्या सीतामढीमध्ये एक मुलगी रील व्हिडिओ बनवत होती. तेव्हा अचानक आकाशातून वीज कोसळली. सुदैवाने वीज पडण्यापासून ती तरुणी बचावली’. (Shocking Video)सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून अनेक नेटकऱ्यांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलंय, ‘किती भयानक आहे हे’. तर अन्य एकाने म्हटले, ‘रिलच्या नादात काय झालं असत.. विचारही करवत नाही’.