Shocking video : नीलगायीच्या धडकेत बाईकस्वाराचा मृत्यू; छातीत शिंग घुसून जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shocking video) रस्त्यावर गाडी चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे आणि आजूबाजूला लक्ष देणे या दोन महत्वाच्या गोष्टी वारंवार सांगितल्या जातात. कारण रस्त्यावर वाहतुकीदरम्यान कधी काय घडेल, याचा कुणीच नेम लावू शकत नाही. भांडण, मारामाऱ्या, अपघात हे तर रोजच आहे. शिवाय एखादा प्राणी अचानक रस्त्यावर आल्याने होणाऱ्या अपघातांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशातच हृद पिळवटून टाकेल अशा एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

नीलगायीची शिंग छातीत घुसल्याने तरुणाचा मृत्यू

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Shocking video) होतो आहे. जो उत्तर प्रदेशातील अयोध्येतील घटनेचा असल्याचे समजत आले आहे. हा व्हिडीओ एका विचित्र अपघाताचा आहे. ज्यामध्ये वेगाने धावत आलेल्या निलगायीने एका बाइकस्वाराला धडक दिल्याचे दिसत आहे. यावेळी निलगायीची शिंग छातीत घुसल्याने या बाइकस्वाराचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या घटनेबाबत नेटकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

निलगायीनेही सोडले प्राण

ही घटना इनायत नगर ठाण्याच्या हद्दीतील मिठे गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली. या भीषण अपघातात वेगाने रस्ता ओलांडणाऱ्या निलगायीने थेट बाईकला धडक दिल्याने बाईकस्वार २८ वर्षीय तरुणाचा जीव गेलाय. माहितीनुसार, या अपघातात निलगायीचे शिंग थेट छातीत घुसल्याने दुचाकीस्वार गंभीर स्वरूपात जखमी झाला होता. (Shocking video) त्याला तडक रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र उपचारादरम्यान त्याने प्राण सोडले. तसेच या अपघातात बाईकला धडक दिलेल्या नीलगायीचा देखील मृत्यू झाल्याचे समजत आहे.

व्हायरल व्हिडीओ (Shocking video)

या दुःखद घटनेचा अत्यंत थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. या भीषण अपघाताचा व्हिडीओ जवळच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आणि त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार. मृत युवक विवाहित असून त्याला ४ वर्षांची मुलगी आहे. (Shocking video) हा व्हिडीओ X हॅण्डलवर SachinGupta नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून रस्त्यावर गाडी चालवताना किती सतर्क राहण्याची गरज आहे ते समजते.