इंडियन आयडॉल’ विजेता पवनदीप राजन भीषण अपघातात गंभीर जखमी; व्हिडीओ आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Singer Pawandeep Accident : आपल्या सुरेल आवाजाने कोट्यवधी चाहत्यांची मनं जिंकणारा ‘इंडियन आयडॉल 12’ चा विजेता पवनदीप राजन एक गंभीर वाहन अपघातात सापडला आहे. सोमवारच्या पहाटे अमरोहा येथे त्याच्या गाडीला भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत तॊ (Singer Pawandeep Accident) गंभीर जखमी झाला आहे. अपघात इतका जबरदस्त होता की गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये पवनदीप गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल होताना दिसत आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्यांना डाव्या पायाला आणि उजव्या हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत. अपघातानंतर लगेचच त्यांना नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत विधान अद्याप दिलेले नाही, मात्र सध्या त्यांची स्थिती गंभीर पण स्थिर असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

फॅन्समध्ये चिंता (Singer Pawandeep Accident)

ही बातमी समोर येताच पवनदीपच्या लाखो चाहत्यांमध्ये चिंता पसरली आहे. सोशल मीडियावर #PrayForPawandeep ट्रेंड करत आहे. त्यांच्या गाण्यांवर प्रेम करणारे चाहते त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

उत्तराखंडमधील चंपावत जिल्ह्यातून आलेले पवनदीप राजन हे फक्त एक गायक नाहीत तर एक संपूर्ण संगीतकार आहेत. त्यांच्या संगीतमय घरातून आलेल्या पवनदीप यांची कारकीर्द २०१५ साली ‘द वॉईस इंडिया’ जिंकून सुरू झाली. पण खरी ओळख त्यांना मिळाली २०२१ मध्ये ‘इंडियन आयडॉल 12’ जिंकल्यानंतर. या शोमध्ये त्यांनी आपल्या सोज्वळ स्वभावाने, सशक्त गायकीने आणि विविध वाद्यांवर असलेल्या पकडीतून प्रेक्षकांचे मन जिंकले.

जिंकली ट्रॉफी, मिळवली मने

इंडियन आयडॉल जिंकल्यावर पवनदीपला एक आलिशान कार आणि २५ लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले. शोमधील त्यांच्या लाइव्ह परफॉर्मन्सेस आजही युट्यूबवर लाखो वेळा पाहिले जातात. त्यांची गाण्यांवरील निष्ठा, विविध संगीतप्रकारात सहजतेने स्विच होण्याची क्षमता, आणि इन्स्ट्रुमेंटल कौशल्य हे त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतं.

गायक ते संपूर्ण संगीतकार पवनदीपचा प्रवास (Singer Pawandeep Accident)

शो संपल्यानंतर पवनदीपने इंडिपेंडंट अल्बम्स, विविध कलाकारांसोबत कोलॅबोरेशन, आणि चित्रपट संगीतातही सहभाग घेतला आहे. स्वतःच्या स्टाईलमध्ये त्यांनी संगीताच्या क्षेत्रात आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लाइमलाइटपासून दूर राहत, ते त्यांच्या सोलो प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करत आहेत.

पवनदीप लवकर बरा होवो

सध्या संगीतविश्व, चाहते, आणि सहकलाकार सर्वजण पवनदीपच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करत आहेत.