SIP Investment : मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी ‘या’ योजनेत गुंतवणूक करा; मिळेल कोट्यवधींचा परतावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (SIP Investment) जगभरातील प्रत्येक पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणाची आणि उज्ज्वल भविष्याची चिंता सतावत असते. पालकांना आपल्या मुलांनी हे करावं ते करावं, असं मोठं व्हावं तसं नाव कमवावं अशा अनेक अपेक्षा असतात. मात्र मुलांच्या सर्वांगीण विकासासह त्यांच्या भविष्यासाठी पालकांना बऱ्याच प्रकारे तडजोड करावी लागते. विशेष करून आर्थिक नियोजनाकडे अधिक लक्ष द्यावा लागतो. भविष्यात आपली मुलं कोणत्या क्षेत्रात शिक्षण घेतील हे आधीपासून सांगणे कठीण असते. मात्र त्यांना आवडत्या क्षेत्रात करिअर घडवताना कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये म्हणून आपण सुरुवातीपासूनच त्याच्यासाठी बचत करायला हवी.

आज आपण अशाच एका गुंतवणुकीच्या पर्यायाविषयी जाणून घेणार आहोत. ज्याच्या माध्यमातून आपण गुंतवलेल्या रकमेत आपल्या मुलांसाठी १८ वर्षात १ कोटी रुपयांपेक्षा जास्त फंड तयार करू शकतो. मग मुलांचे शिक्षण, मुलांचे करिअर, व्यावसाय किंवा लग्न अशा कोणत्याही मोठ्या खर्चाची चिंता काही प्रमाणात कमी होऊ शकते. चला तर हा गुंतवणुकीचा पर्याय कोणता आणि कसा लाभ देतो? याविषयी जाणून घेऊया.

काय आहे ही योजना? (SIP Investment)

मित्रांनो तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात SIP विषयी ऐकले असाल. आपण ज्या योजनेबद्दल बोलतोय ती हीच योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून आपण पैसे गुंतवले असता फंडावर अधिक ताण न येत आपण ही रक्कम अगदी सहज तयार करू शकतो. फक्त या योजनेत दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करणे बंधनकारक आहे. ज्याच्या माध्यमातून १८ वर्षांच्या आत आपण सहज १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करू शकतो.

प्रतिमहिना करा ‘इतकी’ गुंतवणूक

SIP मध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्यात एक ठराविक रक्कम जमा करावी लागते. (SIP Investment) आता उदाहरण घ्यायचं म्हटलं तर, तुम्ही तुमच्या मुलांसाठी १८ वर्षापर्यंत समजा दरमहा १५ हजार रुपयांची बचत केली तर या कालावधीत १ कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा करू शकाल. कारण SIP मध्ये तुम्हला म्युच्युअल फंडात गुंतवलेल्या पैशातून दीर्घ मुदतीत सरासरी १२% इतका परतावा दिला जातो. जो आजच्या घडीला १५% दिला जात आहे.

SIP कॅल्क्युलेशननुसार, प्रति महिना १५००० गुंतवल्यास १८ वर्षात ३२ लाख ४० हजार रुपये जमा होतील. रिटर्न्सबाबत बोलायचे झाले तर या रकमेवर सुमारे १२% प्रमाणे ८२ लाख ४१ हजार ५०० रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल. यात मूळ रक्कम जोडल्यास १ कोटी १४ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा झाल्याचे दिसेल. (SIP Investment) यामध्ये जर तुमचा परतावा १५% असेल तर नफा २ कोटी रुपयांपर्यंत देखील असू शकतो. यानुसार तुमचे अपत्य १८ वर्षांचे असेल तेव्हा तुमच्याकडे आधीच साधारण १ कोटी रुपयांइतका निधी असेल. या रकमेतून तुम्ही मुलांचे शिक्षण, व्यवसाय उभारणी किंवा अगदी लग्न देखील लावू शकता.