Skin Care Routine : उन्हाळ्यात त्वचेची ‘अशी’ काळजी घ्या; सनटॅन, रॅशेसची समस्या त्रास देणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care Routine) कोणत्याही ऋतूत चेहऱ्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. कारण चेहऱ्यावरील त्वचा अत्यंत संवेदनशील असते. थंडीच्या दिवसात रखरखीत होणारी त्वचा ही उन्हाळ्याच्या दिवसात रॅशेज, सन टॅन आणि सन बर्नसारख्या समस्यांना सामोरे जात असते. अशा दिवसात आपल्याला आपल्या त्वचेची अधिकाधिक काळजी घेणं गरजेचं असतं. यासाठी नेमकं काय करायचं? हे बऱ्याच लोकांना माहीत नसल्यामुळे त्वचेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं.

उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेचा तुकतुकीतपणा निघून जाण्यासाठी बरीच कारण जबाबदार असतात. धूळ, माती, प्रदूषण एकीकडे आणि उन्हाची तीव्रता एकीकडे. (Skin Care Routine) यामुळे त्वचेचे होणारे नुकसान वेळीच थांबवले नाही तर स्वतःचा चेहरा स्वतःच बघताना जे दुःख होतं ते फार वाईट. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेची काळजी कशी घ्यावी? याबाबत काही टिप्स देणार आहोत. त्या जाणून घ्या आणि येत्या उन्हाळ्यात जरूर फॉलो करा. ज्यामुळे तुमची त्वचा निस्तेज होणार नाही आणि चमकदार राहील.

उन्हाळ्याच्या दिवसात ‘अशी’ घ्या त्वचेची काळजी (Skin Care Routine)

क्लिंजर आवश्यक

उन्हाळ्याचे दिवस असो किंवा इतर कोणताही ऋतू आपल्या चेहऱ्याला क्लिनिंगची अत्यंत आवश्यकता असते. त्यामुळे दिवसभराच्या रुटीनमध्ये क्लिंझरचा वापर करणे फार गरजेचे आहे. यासाठी आपल्या त्वचेला सूट करणारे क्लिंजर खरेदी करा आणि चेहऱ्यासाठी वापरा. यामुळे चेहऱ्यावरील पोअर्समध्ये साचलेली धूळ निघून जाण्यासाठी मदत होते. परिणामी धुळीमुळे त्वचेचा होणारे नुकसान टाळता येते.

टोनर महत्वाचे

(Skin Care Routine) क्लिंझरनंतर चेहऱ्यावर टोनरचा वापर देखील अत्यंत आवश्यक आहे. कारण टोनर तुमच्या त्वचेला हाइड्रेट करते आणि त्वचेची पीएच लेवल बॅलन्स करते. यामुळे त्वचेतील मुलायमपणा कायम राहतो. आपली त्वचा कोरडी झाल्यास खाज येणे यासारखी समस्या निर्माण होऊ शकते. ही समस्या टाळण्यासाठी टोनरचा वापर करणे गरजेचे आहे. टोनर म्हणून गुलाब पाण्याचादेखील वापर करता येतो.

मॉइश्चरायझरची गरज

कोणत्याही ऋतूमध्ये तुमची त्वचा मॉइश्चराईज करणं फार गरजेचं असतं, हे पहिलं लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्या डेली केअर रुटीनमध्ये मॉइश्चरायजर लावण्याच्या प्रक्रियेला जरूर समाविष्ट करा. यामुळे तुमची त्वचा मुलायम राहते. शिवाय तुमची त्वचा कोरडी होत नाही. मात्र जर तुमची त्वचा प्रचंड ऑयली असेल तर जेल बेस्ड मॉइश्चरायजरचा वापर करा.

सिरमचा वापर

आपल्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी सिरमचा वापर करणे अत्यंत फायदेशीर ठरते. कारण यामध्ये अँटिऑक्सिडन्सचा समावेश असतो. (Skin Care Routine) जो गरमीच्या दिवसात आपल्या त्वचेला प्रदूषण आणि केमिकलपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करतो. मात्र सिरम वापरण्यापूर्वी नेहमी टोनर आणि त्यानंतर मॉइश्चरायझरचा वापर करा. यामुळे सूर्याची हानीकारक किरणे तुमच्या चेहऱ्यावर थेट पडल्याने त्वचेचे नुकसान होणार नाही.

सनस्क्रीन हवंच

संपूर्ण दिवसात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सनस्क्रीन लावणे. कारण सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे आपल्या त्वचेचे थेट नुकसान होत असते. हे नुकसान टाळण्यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीनचा वापर आपल्या त्वचेवर जरूर करा. यामुळे त्वचेला उन्हाच्या किरणांमुळे होणार त्रास टाळता येतो.

हायड्रेशन

संपूर्ण दिवसभरात तुम्ही किती पाणी पिता यावर तुमच्या त्वचेचे आरोग्य अवलंबून असते. कारण त्वचेला हायड्रेट ठेवण्यामध्ये पाणी महत्त्वाची भूमिका निभावते. (Skin Care Routine) आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. यासाठी दिवसभरात ७ ते ८ ग्लास पाणी पिणे फायदेशीर आहे. ज्यामुळे तुमची त्वचा हेल्दी राहील. शिवाय शरीरातील अनावश्यक टॉक्सिन्स बाहेर पडतात.