उन्हाळ्यात त्वचेचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या सनस्क्रीनमध्ये अनेक रसायने असतात, जी काही वेळा त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे नैसर्गिक व घरगुती सनस्क्रीन हा उत्तम पर्याय ठरतो. घरी सहज उपलब्ध असलेल्या घटकांपासून आपण प्रभावी सनस्क्रीन तयार करू शकतो.
घरगुती सनस्क्रीनसाठी प्रभावी घटक
- कोकोनट ऑइल (नारळ तेल) – हे नैसर्गिकरित्या SPF 4-5 देऊन त्वचेला पोषण देते आणि ओलावा टिकवून ठेवते.
- गाजराचे बी तेल (Carrot Seed Oil) – यामध्ये SPF 30-40 असून ते त्वचेच्या सुरक्षेसाठी उपयुक्त आहे.
- बादाम तेल (Almond Oil) – Vitamin E आणि अँटीऑक्सिडंट्सने युक्त असल्यामुळे सूर्यप्रकाशाचा दुष्परिणाम कमी करते.
- झिंक ऑक्साइड पावडर (Zinc Oxide Powder) – हे UVA आणि UVB किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते.
- शे बटर (Shea Butter) – हे त्वचेला हायड्रेट ठेवते आणि नैसर्गिक SPF असलेले आहे. घरगुती सनस्क्रीन बनवण्याची पद्धत
साहित्य:
- 2 टेबलस्पून नारळ तेल
- 1 टेबलस्पून गाजराचे बी तेल
- 1 टेबलस्पून बादाम तेल
- 1 टेबलस्पून शिया बटर
- 1 टीस्पून झिंक ऑक्साइड पावडर
कृती:
- नारळ तेल आणि शिया बटर एका भांड्यात गरम करा.
- त्यात गाजराचे बी तेल आणि बादाम तेल मिसळा.
- मिश्रण थंड झाल्यावर त्यात झिंक ऑक्साइड पावडर मिसळा.
- हे मिश्रण एका काचेच्या डब्यात भरून ठेवा.
कसे वापराल ?
- बाहेर जाण्याच्या 15-20 मिनिटे आधी त्वचेवर लावा.
- गरम हवामानात गरजेप्रमाणे पुन्हा लावा.
- स्वच्छ धुवून कोरड्या त्वचेवर हलक्या हाताने मसाज करून लावा.
अधिक प्रभावी परिणामांसाठी
- टोमॅटो आणि काकडीचा रस नियमितपणे लावल्यास त्वचेला थंडावा मिळतो आणि टॅनिंग टाळता येते.
- एलोवेरा जेल हा देखील नैसर्गिक सनस्क्रीनचा उत्तम पर्याय आहे.
घरगुती सनस्क्रीन हे त्वचेसाठी सुरक्षित आणि किफायतशीर पर्याय आहे. याचा नियमित वापर करून उन्हाळ्यात त्वचेचे नैसर्गिक संरक्षण करा!