ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आता लहान वस्तू मागवता येणार नाहीत ? वाचा नवीन नियम

0
1
e commerce platform
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ई-कॉमर्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ग्राहक ऑनलाईन खरेदीत लहान वस्तूंसह मोठ्या वस्तूही सहज मागवू शकतात. पण आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर (e-commerce platform)काही नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत, ज्यामुळे 10 ते 20 रुपयांच्या बिस्किटे, चहा, कॉफी या सारख्या छोट्या वस्तू ग्राहकांना ऑनलाईन ऑर्डर करण्यास येणार नाहीत. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म हे नवीन नियम का लागू करणार आहेत , याबद्दल आज आपण सविस्तरपणे पाहुयात.

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचे नवीन नियम-

कंपन्यांनी जाहीर केले की, FMCG (Fast-Moving Consumer Goods) उत्पादक कंपन्या जलद ई-कॉमर्स (Quick Commerce) प्लॅटफॉर्मवर लहान आणि परवडणाऱ्या पॅकचा पुरवठा करणार नाहीत. यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. या बदलाची तयारी आधीच सुरू झाली आहे. उदाहरणार्थ, पार्लेने 50-100 रुपयांच्या पॅकची नवीन रेंज केली आहे, ज्यात पार्ले-जी, हायड अँड सीक, आणि क्रॅक जॅक सारखी बिस्किटे समाविष्ट आहेत. पण 30 रुपयांपर्यंतची पार्ले बिस्किटे केवळ किराणा दुकानातच उपलब्ध असतील.

बिस्किटांच्या पॅकमध्ये विक्री –

रिलायन्स आणि डीमार्टसारख्या रिटेल चेन 120 ते 150 रुपयांच्या बिस्किटांच्या पॅकमध्ये विक्री करतील. तसेच, आयटीसी आणि अदानी विल्मर सारख्या कंपन्यांनी त्यांच्या क्विक कॉमर्स पॅकेजेसमध्ये विविध उत्पादनांच्या नवीन पॅक लाँच करणार आहेत.

किराणा दुकानदारांसाठी निर्णय –

ई-कॉमर्स (e-commerce platform)आणि क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्सच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे, किराणा दुकानदारांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे, किराणा दुकानमालकांनी याविरुद्ध आवाज उठवला होता. या विरोधाची दखल घेत, FMCG कंपन्यांनी छोटे पॅक केवळ दुकानदारांसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे ग्राहकांना किराणा दुकानदारांकडून या छोट्या वस्तूच विकत घेण्याची आवश्यकता असेल.

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर मागणी –

शहरी भागात मागणी कमी झाल्यामुळे FMCG कंपन्यांचे उत्पन्न कमी झाले आहे. पण ग्रामीण भागात मागणी वाढत आहे. त्यामुळे कंपन्या ग्रामीण भागासाठी वेगवेगळ्या किंमतीच्या उत्पादनांचे छोटे पॅक तयार करत आहेत. यामुळे कंपन्यांना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर मागणी मिळत आहे, आणि त्यांच्यासाठी विविध पॅक आकारांच्या प्रीमियम उत्पादने लाँच करण्यात आली आहेत.