हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Small Savings Scheme) आजकाल प्रत्येकाला गुंतवणुकीचे महत्व कळून चुकले आहे. त्यामुळे आजच्या जगात पैसा कमावणेच नव्हे तर योग्य ठिकाणी गुंतवणे गरजेचे आहे, हे अनेकांनी मान्य केले आहे. गेल्या काही काळात गुंतवणुकीच्या जगात अनेक लोकांनी प्रवेश केला आहे. तर अद्याप बरेच लोक गुंतवणुक करताना पर्यायांची निवड करताना संभ्रमित होऊन माघार घेतात. अशा लोकांसाठी आजची बातमी महत्वाची ठरेल. कारण आज आज आम्ही तुम्हाला गुंतवणुकीची सुरुवात करताना कोणत्या योजनांची मदत घ्यावी, याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत.
कधीही गुंतवणुक करतेवेळी एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ज्या योजनेत गुंतवणूक करत आहात ती योजना सुरक्षित आणि खात्रीची आहे का? याची आधी खात्री करून घ्या. (Small Savings Scheme) अशा सामान्य गुंतवणूकदारांसाठी सर्वात चांगला गुंतवणूकीचा पर्याय कोणता असू शकतो? याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. चला तर सुरक्षा आणि निश्चित परतावा देणाऱ्या टॉप १० लहान बचत योजनांविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया.
1. मासिक उत्पन्न खाते
मासिक उत्पन्न खात्यात गुंतवणूक करताना किमान मासिक स्वरूपात १ हजार रुपये गुंतवावे लागतात. (Small Savings Scheme) या खात्यात कमाल गुंतवणुकीची मर्यादा एकल खात्यात १ लाख आणि संयुक्त खात्यात १५ लाख रुपये इतकी आहे.
2. पोस्ट ऑफिस बचत योजना
पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक योजना सादर केल्या जातात. यातील पोस्ट ऑफिस बचत योजना ही नवीन गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय ठरू शकते. (Small Savings Scheme) या योजनेचे खाते उघडण्यासाठी किमान ५०० रुपये जमा करावे लागतात. मुख्य म्हणजे या योजनेत ठेव रकमेवर कमाल मर्यादा नाही.
3. टाईम डिपॉझिट (Small Savings Scheme)
नवीन गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना देखील एक चांगला पर्याय ठरू शकते. या योजनेत १ वर्ष, २ वर्ष, ३ वर्ष किंवा ५ वर्ष कालावधीसाठी गुंतवणूक करता येते. या योजनेच्या खात्यात किमान १ हजार रुपये रक्कम जमा करावी लागते. यातही गुंतवणुकीवर कमाल मर्यादा नाही.
4. रिकरिंग डिपॉझिट योजना (५ वर्षे)
रिकरिंग डिपॉझिट योजना म्हणजेच आवर्ती ठेव योजना हा देखील नव्या गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय आहे. (Small Savings Scheme) या योजनेच्या खात्यात किमान १०० रुपये प्रति महिना जमा करावे लागतात. तसेच या योजनेत कमाल मर्यादा नाही.
5. ज्येष्ठ नागरिक बचत योजना
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या खात्यात किमान ठेव ही १ हजार रुपये असणे बंधनकारक आहे. (Small Savings Scheme) तर या योजनेच्या खात्यात ३० लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंतच गुंतवणूक करता येते.
6. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF योजनेचे खाते उघडण्यासाठी किमान ५०० रुपये रक्कम जमा करावी लागते. तसेच या योजनेत कमाल १.५ लाख रुपये गुंतवणुकीची मर्यादा आहे. (Small Savings Scheme) या योजनेतील ठेव ही एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये करता येते.
7. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अर्थात NSC योजनेत गुंतवणूक करताना किमान १ हजार रुपये गुंतवावे लागतात. तर या योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादानिश्चित केलेली नाही, हे लक्षात घ्या.
8. किसान विकास पत्र (KVP)
किसान विकास पत्र म्हणजेच KVP या सरकारी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना किमान १ हजार रुपये रक्कम जमा करावी लागते. (Small Savings Scheme) तर, कमाल गुंतवणुकीची यात कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही.
9. सुकन्या समृद्धी खाते योजना (SSY)
सुकन्या समृद्धी खाते योजना अर्थात SSY योजनेच्या खात्यात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारास किमान २५० रुपये रक्कम जमा करावी लागते. तसेच यामध्ये कमाल रक्कम १.५ लाख रुपये भरण्याची मर्यादा आहे. यामध्ये एकाच वेळी ठेवी करता येतात. त्यामुळे एका महिन्यात किंवा आर्थिक वर्षात जमा केलेल्या रकमेवर कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही.
10. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही सरकारी योजना केवळ महिलांसाठी काम करते. (Small Savings Scheme) यामध्ये खाते सुरु करताना गुंतवणूकदार महिलांना किमान १ हजार रुपये गुंतवावे लागतात.