स्मृतीची कमाल ! मोडला हरमनप्रीतचा सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम

smruti
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीची फलंदाज स्मृती मानधना हिची बॅट जोरदार चालत आहे. राजकोटमध्ये आयर्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात स्मृती मंधानाने झंझावाती शतक झळकावले. मंधानाने अवघ्या 70 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले आणि यासह महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासात एक नवा विक्रम रचला.

मंधानाने भारतासाठी महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. यासह तिने हरमनप्रीतचा वेगवान शतकाचा विक्रम मोठ्या फरकाने मोडला. याआधी हरमनप्रीतने 2024 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यात 87 चेंडूत शतक झळकावले होते.

स्मृती मंधानाचे वनडे कारकिर्दीतील हे 10 वे शतक आहे. यासह, भारतीय सलामीवीर एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात 10 शतके झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. एवढेच नाही तर महिला वनडे क्रिकेटच्या इतिहासात 10 किंवा त्याहून अधिक शतके झळकावणारी ती जगातील चौथी खेळाडू ठरली आहे.

महिला वनडेत सर्वाधिक शतके
15 – मेग लॅनिंग
13 – सुझी बेट्स
10 – टॅमी ब्यूमाँट
10 – स्मृती मानधना

सलग 10व्या डावात मंधानाचा हा 8वा 50+ धावसंख्या आहे. यावरून ती किती उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे याचा अंदाज लावता येतो. या संपूर्ण मालिकेत मंधानाला युवा सलामीवीर फलंदाज प्रतिका रावलची जबरदस्त साथ मिळत आहे. या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 200 हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे.