गुजरातमध्ये समाजप्रबोधनाचा अनोखा गरबा, काय होतं नक्की या गरब्यात??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । देशभरात मागील नऊ दिवस नवरात्रीचा उत्सव सुरू होता. आज दसऱ्याच्या निमित्ताने या उत्सवाची सांगता होईल. रास दांडिया आणि गरबा खेळण्याचा आनंद लुटण्यात भारतीय लोक व्यस्त असताना गुजरातमध्ये अनोख्या प्रकारचा गरबा नवरात्रीच्या शेवटच्या दिवसांत पहायला मिळाला.

गरबा खेळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या हातात सॅनिटरी पॅड घेतले होते. दांडियांच्या ऐवजी सॅनिटरी पॅड घेऊन लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन आणि टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मागील काही वर्षांमध्ये महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा हा प्रश्न सातत्याने उजेडात आणला जात असल्यामुळे एकूण सकारात्मक वातावरण महाराष्ट्र, गुजरात आणि इतर राज्यांमध्येही दिसून येत आहे.