हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Special FD) आजच्या घडीला गुंतवणूक किती महत्वाची आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. गुंतवणुकीचे महत्व अनन्य साधारण आहे आणि त्यामुळे आज जपतो तो कमावण्यासोबत गुंतवणुकीचे चांगले व सर्वोत्तम पर्यायांच्या शोधात असतो. दरम्यान, बरेच गुंतवणूकदार हे एफडी मध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात. जर तुम्हीसुद्धा एफडीत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी ही बातमी स्किप न करता वाचा. कारण, पंजाब आणि सिंध बँक विशेष एफडी ऑफर करत आहे. ज्यात गुंतवणूक करण्यासाठी काहीच दिवस बाकी आहेत. मुख्य म्हणजे ही बँक चांगल्या व्याजदरासह सर्वाधिक परतावा देणार आहे. चला तर याविषयी जाणून घेऊया.
पंजाब आणि सिंध बँकेची विशेष FD (Special FD)
माहितीनुसार, पंजाब आणि सिंध बँक ‘धनलक्ष्मी’ नावाची विशेष एफडी योजना आपल्या ग्राहकांना ऑफर करत आहे. ज्यामध्ये गुंतवणुकीचा कालावधी ४४४ दिवसांचा असून यात सामान्य नागरिकांना ७.४% तर ज्येष्ठांना ७.९% व्याजदर दिला जातोय. मुख्य म्हणजे, अति ज्येष्ठ नागरिकांना या योजनेंतर्गत ८.०५% व्याजदर मिळतोय. दरम्यान, पंजाब आणि सिंध बँक आपल्या ग्राहकांना २२२ दिवस आणि ३३३ दिवसांची विशेष एफडी ऑफर करत आहेत. याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
कोण गुंतवणूक करू शकतो?
पंजाब आणि सिंध बँकेकडून ऑफर केल्या जाणाऱ्या या विशेष एफडीमध्ये सर्व भारतीय रहिवासी, NRI आणि अगदी NRO सुद्धा गुंतवणूक करू शकतात. (Special FD)
कालावधी आणि व्याजदर
पंजाब आणि सिंध बँकेकडून आपल्या ग्राहकांना २२२ दिवस, ३३३ दिवस आणि ४४४ दिवसांची विशेष एफडी ऑफर केली जात आहे. ज्यावर कमाल ८.०५% इतका व्याजदर उपलब्ध आहे. या बँकेने आपल्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, २२२ दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना ७.०५% तर ३३३ दिवसांच्या एफडीवर ७.१०% आणि ४४४ दिवसांच्या एफडीवर ७.२५% व्याजदर दिला जातोय. (Special FD) तसेच या बँक ज्येष्ठ नागरिकांना ४४४ दिवसांच्या एफडीवर ८.०५% इतका व्याजदर देत आहेत. अर्थात या बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना ०.५०% अतिरिक्त व्याजदर मिळतोय. तर अति ज्येष्ठ नागरिकांना ०.५०% व्यतिरिक्त ०.१५% अतिरिक्त व्याज दिले जात आहे.
या विशेष एफडीमध्ये ७ ते ३० दिवसांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केली असता २.८% दराने व्याज दिले जाईल. तर ३१ ते ४५ दिवसांच्या गुंतवणुकीवर ३% दराने व्याज मिळेल. याशिवाय ४६ ते ९० दिवसांच्या गुंतवणुकीवर ४.२५% आणि ९१ ते १७९ दिवसांच्या कालावधीसाठी केलेल्या गुंतवणुकीवर ४.२५% दराने व्याज दिले जाईल. (Special FD) पुढे १८० ते २६९ दिवसांच्या गुंतवणुकीवर ५.२५% व्याज मिळेल. तसेच १ वर्ष अर्थात ३६५ दिवसांच्या कालावधीसाठी गुंतवणुक केली असता ६.२०% व्याजदर दिला जाईल.
या विशेष एफडीमध्ये ४४४ दिवसांच्या कालावधीसाठी गुंतवणूक केली असता ७.४% व्याज मिळेल. तर, २ वर्षांसाठी ४४५ रुपयांच्या गुंतवणुकीवर या एफडी योजनेंतर्गत ६% व्याजदर दिला जात आहे. (Special FD) २ वर्ष ते २ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी ६.३०% आणि ३ वर्ष ते ५ वर्षांच्या कालावधीसाठी केलेल्या गुंतवणुकीवर ६% व ५ वर्ष ते १० वर्षांच्या गुंतवणुकीवर एकूण ६.२५% व्याज दिले जाईल.