आजकाल तुम्हाला असे कोणते घर सापडणार नाही जिथे फ्रिज नाही. कमीतकमी सिंगल डोअरचा फ्रिज तरी प्रत्येक घरात असतोच असतो. पण जेवढा फ्रीजचा वापर करतो तेवढा त्याच्या मेंटेनन्स आपण करतो का ? आता तुम्ही म्हणाल फ्रीजचा मेंटेनन्स कसला ? तर मंडळी प्रत्येक वस्तूची जर योग्यवेळी नीट काळजी घेतली गेली तर ती वस्तू दीर्घकाळ टिकते. फ्रिजच्या बाबतीतही तसेच आहे. फ्रिज जर दीर्घकाळ चांगल्या प्रकारे टिकवायचा असेल तर तुम्हाला त्याबाबत काळजी घेतलीच पाहिजे. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला फ्रिजमध्ये असणाऱ्या एका बटन विषयी माहिती देणार आहोत ज्यामुळे फ्रिजचे आयुष्य तब्बल १० वर्षांनी वाढेल. चला तर मग जाणून घेऊया…
वेळोवेळो फ्रेज करा डीफ्रॉस्ट
ज्या वेळेला फ्रिजरमध्ये बर्फ गोळा होतो तेव्हा फ्रिजरला थंड ठेवण्यासाठी अधिकाधिक मेहनत घ्यावी लागते. हा बर्फ एक प्रकारच्या इन्सुलटर चे काम करत असतो. त्यामुळे फ्रिज थंड ठेवण्यासाठी अधिकाधिक विजेचा वापर करावा लागतो. मात्र हे खास बटन दाबून डीफ्रॉस्ट केल्याने हा अतिरिक्त बर्फ हटवला जातो त्यामुळे फ्रिजरवर फारसा ताण येत नाही आणि त्यामुळे परिणामी वीजही कमी लागते
जास्त बर्फ जमल्यावर काय होते ?
आता तुम्ही असा विचार करत असाल तर हा तर फ्रीज आहे आणि फ्रिजमध्ये बर्फ हा होणारच फ्रीजरमध्ये अधिक प्रमाणात बर्फ झाल्यावर नक्की काय होईल? तर याचे उत्तर असे आहे, जास्त प्रमाणात बर्फ तयार झाल्यास मोटर वर अधिकाधिक दबाव पडतो तसेच मोटार खराब होऊ शकते. मात्र डीफ्रॉस्ट केल्यानंतर फ्रीजरवरच्या मोटरवर कमी दबाव पडतो आणि मोटर दीर्घकाळ टिकून राहते.
डिफ्रॉस्टिंग झाल्यामुळे काय होते ?
फ्रॉस्टिंग झालेला बर्फ हटवल्यामुळे नेमकं काय घडतं तर बर्फ हटवल्यानंतर फ्रीजर थंड हवा समान रित्या पूर्ण फ्रिजमध्ये पसरवू शकतो. त्यामुळे तुम्हाला फ्रिज मधील पदार्थ थंड ठेवण्यास मदत मिळते. त्यामुळे त्यामधील पदार्थ हे ताजे सुद्धा राहतात. जेव्हा बर्फ पसरलेला असतो तेव्हा हवा व्यवस्थित पसरू शकत नाही त्यामुळे फ्रीझरचा काही भाग हा थंड तर काही भाग गरम राहतो.
ठराविक कालावधीने बर्फ साचल्यानंतर तुम्ही डिफ्रॉस्टिंग केल्यामुळे फ्रीजरमध्ये अधिकची जागाही मोकळी होते त्यामुळे तुम्हाला कधी कधी जादा सामान फ्रिज मध्ये ठेवता येते. नव्या आलेल्या काही फ्रिजमध्ये डीफ्रॉस्ट आपलेआपण होते बटन दाबून ते करावे लागत नाही. तर काही फ्रीजला मात्र बर्फ साठल्यानंतर डीफ्रॉस्ट करावे लागते.