SSC Hall Ticket 2025: 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! हॉल तिकीट दोन दिवसांत उपलब्ध होणार

0
1
SSC Hall Ticket 2025
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

SSC Hall Ticket 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2025 च्या दहावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे (SSC Hall Ticket 2025) ऑनलाइन जारी करण्याची तारीख जाहीर केली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट येत्या सोमवार, 20 जानेवारी 2025 पासून उपलब्ध होणार आहे.

हॉल तिकीट कसे डाऊनलोड करावे?

  • सर्व माध्यमिक शाळांनी संकेतस्थळ www.mahahsscboard.in वर Admit Card या लिंकद्वारे प्रवेशपत्र प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत.
  • विद्यार्थ्यांकडून हॉल तिकीटासाठी कोणतेही वेगळे शुल्क आकारले जाऊ नये.
  • प्रिंट काढल्यानंतर मुख्याध्यापकांनी त्यावर शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी.
  • “Paid” स्टेटस असलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे संबंधित पर्यायांद्वारे उपलब्ध असतील.
  • अतिविलंबाने अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे Extra Seat No Admit Card पर्यायाद्वारे मिळतील.
  • हॉल तिकीट गहाळ झाल्यास, शाळांनी नवीन प्रिंट काढून त्यावर “Duplicate” असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र(SSC Hall Ticket 2025) उपलब्ध करून द्यावे.

बारावीची परीक्षा आणि प्रवेशपत्र

बारावीच्या परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होतील.
बारावीच्या प्रवेशपत्रे 10 जानेवारीपासून संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
ज्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावरील फोटो दोषपूर्ण आहेत, त्यावर फोटो चिकटवून मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी.

महत्त्वाची सूचना (SSC Hall Ticket 2025)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी सांगितले की, हॉल तिकीट गहाळ झाल्यास, शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने नवीन प्रिंट काढून ती विद्यार्थ्यांना द्यावी. विद्यार्थ्यांनी वेळेत आपले प्रवेशपत्र शाळांकडून प्राप्त करून घेऊन परीक्षेसाठी तयारी करावी.