ST Bus: हल्ली सगळ्यांकडे आपआपल्या खासगी गाड्या असतात. वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झालेली सुद्धा पाहायला मिळते. मात्र आजही राज्यातल्या गावखेड्यात लाल परी म्हणजेच राज्य परिवहन मंडळाची ST प्रवाशांसाठी मुख्य वाहन आहे. आजही राज्यातल्या अनेक दुर्गम भागात ST ची सेवा सुरळीत चालू आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून लाल परीचा प्रवासी हा लाल परी कडे पाठ फिरवताना दिसतो आहे. म्हणूनच एसटी महामंडळाकडून आपला प्रवासी परत आणण्यासाठीची धडपड सुरू आहे. त्यासाठी एसटी महामंडळाकडून (ST Bus) अनेक योजना देखील राबवण्यात येत आहेत. त्यातलीच एक योजना म्हणजे ‘आवडेल तिथे प्रवास’
ही योजना 1988 पासून राबवली जाते या योजनेअंतर्गत वर्षभरात 12 कोटी 27 लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. या योजनेअंतर्गत प्रवास करायचा असल्यास दहा दिवसांचा पास देण्यात येत होता मात्र 2006 पासून चार दिवसांचा पासही दिला जात आहे. दोन मे 2010 पासून दहा दिवसांचे पास बंद करून त्याऐवजी सात दिवसांचा पास देण्यात (ST Bus) येत आहे.
काय आहे सध्याची स्थिती ? (ST Bus)
सध्या जलद रातराणी, आंतरराज्य शहरी मिडी बस सेवा अंतर्गत चार दिवसांच्या पाससाठी प्रौढांसाठी 1170 रुपये तर शिवशाही आंतरराज्य करिता 1520 रुपये आकारले जातात. सात दिवसांच्या पाससाठी 2040 व 3,030 रुपये आकारले जातात. तर 2023 ते 2024 या आर्थिक वर्षात 89 हजार 89,633 ची विक्री झाली आहे. आणि त्यातून महामंडळाला 1 हजार 226 लाखांचं उत्पन्न (ST Bus) मिळालं आहे.
काय आहेत नियम ? (ST Bus)
आंतरराज्य वाहतुकीसाठी एसटी सेवा जिथे जाते तिथपर्यंत हे पास वैध राहणार आहेत. योजनेतील सर्व प्रकारचे पास महामंडळाच्या शहरी वाहतुकीत वैध राहतील. उच्च दर्जाच्या गाडीचा पास निम्न दर्जाच्या गाडीस वैध राहतील. पासची मुदत संपल्यानंतर परताना केला जाणार नाही. आवडेल तेथे कोठेही प्रवास पास योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या पासाच्या दिवसाची गणना ००.०० ते २४.०० अशी करण्यात येईल. साध्या सेवेचे (ST Bus) पास सर्व प्रकारच्या साध्या बसेससाठी (साधी, जलद, रातराणी, शहरी, यशवंती (मिडी) आंतरराज्य मार्गासह ग्राह्य राहतील.