ST Bus Strike : शहरी भागाशिवाय ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांवर पोहोचणारी लालपरीची चाकं आता थांबतील की काय ? अशा स्थितीमध्ये आहेत. कारण राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची बातमी आहे. येत्या 9 ऑगस्ट पासून एसटी महामंडळातील 13 संघटनांनी संप पुकारला आहे.
त्यामुळे राज्यात लाल परीची चाकं थांबणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणात एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांवरून हा (ST Bus Strike) संप पुकारण्यात आला आहे.
यापूर्वी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी 2021 मध्ये दीर्घ आंदोलन (ST Bus Strike) केलं होतं. त्यावेळी एसटी बंद झाल्यामुळे अनेकांची गैरसोय झाली होती. हा संप तब्बल 54 दिवस चालू राहिला होता. या संपानंतर राज्य शासनाने काही मागण्या मान्य केल्या होत्या मात्र कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर करण्याचे आश्वासन दिले गेले होते. परंतु त्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाहीत असा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी (ST Bus Strike) संपाची हाक दिली आहे. आता ऑगस्ट महिन्यात अनेक सण येणार आहेत त्यामुळे या काळात प्रवाशांच्या संख्यांमध्ये मोठी वाढ होते पण एकूणच संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ शकते
काय आहेत मागण्या (ST Bus Strike)
सर्वच कामगारांच्या मूळ वेतनामध्ये सरसकट पाच हजार रुपयांची वाढ करावी,
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावं.
- सन 2016 ते 2020 या कालावधीसाठी जाहीर केलेल्या 4849 कोटी मधील शिल्लक रक्कम वाटप करावी.
- कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना देय होणारी थकबाकी महागाई भत्ता देण्यात यावा.
- घरभाडे भत्ता व वार्षिक वेतन वाढ थकबाकी अदा (ST Bus Strike) करावी.